आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दहशत:अशोका मार्गावर मोकाट कुत्र्यांची दहशत ; मुले जखमी झाल्याच्या घटना

नाशिक4 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

शहरात ठिकठिकाणी मोकाट कुत्र्यांचा सुळसुळाट झाला असून अनेकांना या कुत्र्यांनी चावा घेतला आहे. महापालिका कर्मचाऱ्यांना मोकाट कुत्री पकडण्याबाबत अद्याप जाग येत नसल्याने नागरिकांकडून आश्चर्य व्यक्त केले जात आहे.अशोका मार्गावर कुत्र्यांची सख्या प्रचंड वाढली असून तक्रारींकडेही दुर्लक्ष केले जात असल्याचे चित्र आहे.

शहरातील अशोका मार्ग, पखालरोड, वडाळारोड भागात काही दिवसांपासून मोकाट कुत्र्यांच्या हैदोसामुळे ज्येष्ठांसह लहान मुले जखमी झाल्याच्या घटना घडल्या आहेत. मात्र, महापालिका कर्मचाऱ्यांना याचे सोयरसूतक नसल्याचे दिसून येते. महापालिकेच्या पूर्व विभागात कुत्रे पकडण्याची मोहीम अनेक दिवसांपासून ठप्प झालेली आहे. या परिसरात मोकाट कुत्र्यांमुळे नागरिक हैराण झाले असून परिसरात फिरणेदेखील मुश्कील झाले आहे. अशोका मार्गावरील जयहिंद कॉलनी, ममतानगर, फातेमानगर, सेक्रेट हार्ट शाळा परिसरातील नागरिक भटक्या कुत्र्यांचा वावर असल्याने त्रस्त झाले. पायी चालणाऱ्या ज्येष्ठ नागरिकांना या कुत्र्याने चावा घेतला आहे. महिला व लहान मुलांच्या मागे लागतात. त्यामुळे अपघात होत आहे.

निर्बीजीकरण केलेल्या मोकाट कुत्र्यांचे प्रमाण जास्त आहे. या भागात दररोज नागरिक ये-जा करीत असतात.तसेच, काही कामगारांना नाईट शिफ्ट असते. अशावेळी ही कुत्री नागरिकांच्या अंगावर धावतात. तसेच रात्रीच्या वेळी नागरिकांना मोकाट कुत्र्यांचा सामना करावा लागतो.

या कुत्र्यांचा मोठ्या माणसाबरोबरच लहान मुलांनाही त्रास होत आहेच. माेकाट कुत्र्यांचा त्रास डीजीपीनगर ते वडाळागाव राेडवर देखील सहन करावा लागतो. रात्रीच्या वेळेस तर येथून मार्ग काढताना तारेवरची कसरत करावी लागते.

बातम्या आणखी आहेत...