आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भीतीचे वातावरण:सिडकाेत मोकाट श्वानांची दहशत; रात्रीच्यावेळी नागरिकांवर हल्ला

सिडको4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

शहरातील माेकाट श्वानांचे वाढते प्रमाण रोखण्यासाठी श्वान निर्बीजीकरण करण्यात येते. मात्र हे निर्बीजीकरण नक्की होते की नाही? हा प्रश्न असून सिडको, अंबड, पाथर्डी फाटा परिसरात रस्त्यांवर मोकाट श्वानांचा सुळसुळाट झाला आहे. रात्रीच्या वेळी हे श्वास थेट नागरिकांवर हल्ला करत असल्याने भीतीचे वातावरण तयार झाले आहे.

महापालिकेच्या वतीने विल्होळीनाका येथे लाखो रुपये खर्च करून श्वान निर्बीजीकरण केंद्र उभारण्यात आले आहे. एका श्वानामागे ठेकेदाराला काही रक्कम अदा केली जाते. वर्षाला श्वान निर्बीजीकरण करण्याच्या नावाखाली लाखो रुपये घेतले जातात. असे असताना श्वानांची उत्पत्ती मात्र थांबत नसून रस्त्यांवर मोकाट श्वानांचे साम्राज्य पसरल्याचे दिसून येत आहे. सिडको परिसर, पाथर्डी फाटा, अंबड औद्योगिक वसाहत या संपूर्ण भागात रात्रीच्या वेळेस श्वानांची दहशत पसरलेली असते. रस्त्यावर जाणाऱ्या येणाऱ्या नागरिकांना, दुचाकीचालकांना याचा मोठा प्रमाणात त्रास होत असतो.

पाठीमागून येत श्वानाचा हल्ला
रस्त्यावर अनेक नागरिक कचरा आणून टाकतात. तेथील कचऱ्यावर श्वानांचे टोळके बसलेले असते. मागून येत श्वानाने माझ्यावर हल्ला केला. याच रस्त्याने लहान मुलेही जात असतात. या श्वानांना मनपाने पकडून न्यावे. - संदीप डोरले, नागरिक

बातम्या आणखी आहेत...