आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भरती प्रक्रिया:ग्रामीण पोलिस दलात चालक पदाच्या 71 जागांसाठी चाचणी

नाशिकएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

ग्रामीण पोलिस दलात पोलिस शिपाई पदाच्या १६५ आणि चालक पदाच्या ७१ जागांसाठी भरती प्रक्रियेला सोमवारी (दि. २) ग्रामीण पोलिस मुख्यालयाच्या मैदानात प्रारंभ झाला. चालक पदाच्या भरतीसाठी आलेल्या उमेदवारांची छाती, उंची आणि १०० मीटर धावण्याची चाचणी घेण्यात आली. भरतीच्या पहिल्या दिवशी उमेदवारांची संख्या कमी होती. चालक पदासाठी २१ हजार ४९ उमेदवारांनी अर्ज केला आहे. यातील पहिल्या टप्प्यात ऑनलाइन अर्ज केलेल्या उमेदवारांना चाचणीकरिता बोलवण्यात आले होते.

ग्रामीण पोलिस दलाच्या मैदानावर सकाळी ६ वाजेपासून उमेदवार उपस्थित होते. थंडीमध्येही उमेदवार चाचणीसाठी पळण्याचा सराव करताना दिसून आले. सोमवारी बोलावण्यात आलेल्या उमेदवारांची छाती उंची आणि कागदपत्रांची पडताळणी करण्यात आली. शिपाई पदासाठी १३ हजार ८५९ उमेदवारांनी अर्ज दाखल केला आहे. यामध्ये १३ हजार ८५९ पुरुष आणि ५ हजार ७३ महिला उमेदवारांसह ३ तृतीयपंथीयांनी अर्ज दाखल केला आहे.

अशी होईल भरती प्रक्रिया पुरुष आणि महिला उमेदवारांची कागदपत्र पडताळणी, उंची, छाती, मोजणे, पात्र उमेदवारांना मैदानी चाचणी मध्ये १६०० व १०० मीटर धावणे, गोळा फेक महिला उमेदवारांसाठी १०० व ८०० मीटर धावणे, गोळा फेक चाचणी घेण्यात येणार आहे.

बातम्या आणखी आहेत...