आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नाशिकला एज्युकेशन हब’ बनविण्यास प्राधान्य:छगन भुजबळ यांची ग्वाही; पुणे विद्यापीठाच्या नाशिक उपकेंद्राचे भूमिपूजन

नाशिक12 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या नाशिक कॅम्पसला नाशिक शहराशी अधिक कनेक्ट करण्यासाठी आरोग्य विज्ञान विद्यापीठाकडून येणारा रस्ता तसेच आवश्यक त्या सर्व पायाभूत सुविधा उपलब्ध करून दिल्या जातील. तसेच येथील नाविन्यपूर्ण अध्यासन केंद्रांसाठी जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून 5 कोटी रुपये निधी उपलब्ध करून दिला जाईल. तसेच नाशिकला एज्युकेशन हब बनविण्यासाठी प्राधान्य असेल असे प्रतिपादन राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री तथा नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री छगन भुजबळ यांनी केले.

मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांच्या हस्ते दुरदृष्यप्रणालीद्वारे तर मंत्री अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ, उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत, केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ. भारती पवार यांच्या उपस्थितीत सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या नाशिक उपकेंद्राच्या इमारतीचे भूमिपूजन पार पडले. त्यावेळी ते बोलत होते.

यावेळी मंत्री छगन भुजबळ म्हणाले की, नाशिक उपकेंद्राची स्वतंत्र इमारत उभी करण्यासाठी आणि नाशिकमध्ये या विद्यापीठाचे स्वतंत्र्य कॅम्पस उभारण्यासाठी कित्येक वर्षांपासून आम्ही प्रयत्नशील होतो. विद्यापीठाचे काम इतके वाढले आहे की, त्याचे विकेंद्रीकरण करण्याची आवश्यकता होती. त्यादृष्टीने आम्ही प्रयत्न केले. त्यातून आज हे उपकेंद्र उभे राहत आहे याचा आनंद आहे. नाशिक मध्ये अनेक शैक्षणिक संस्थांचे जाळे आहे.

मुंबई पुण्यानंतर नाशिकची शैक्षणिक वाटचाल अत्यंत वेगाने सुरु असून देशभरातील तसेच विदेशातील विद्यार्थी शिक्षणासाठी नाशिकला येत असल्याचे त्यांनी सांगितले. त्या गावकऱ्यांचे आभार मानतो ज्यांनी शैक्षणिक कार्यासाठी जमीन उपलब्ध करुन दिली. तुम्हाला या भागात लागणाऱ्या रस्ते, वीज, पाणीया सर्व पायाभुत सुविधा आम्ही निश्चितपणे प्राधान्याने उभ्या करु असे आश्वासन त्यांनी उपस्थित गावकऱ्यांना दिले.

यावेळी विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. डॉ. कारभारी काळे, प्र. कुलगुरू डॉ. संजीव सोनवणे, प्राचार्य विश्वास गायकवाड, डॉ. विजय सोनवणे, डॉ. राजेश पांडे, डॉ. प्रफुल्ल गायकवाड, डॉ. अमित पाटील, डॉ. नंदू पवार, डॉ. तान्हाजी पवार, डॉ. मोतीराम देशमुख, सरपंच सुनीता निंबाळकर, माजी सरपंच पांडुरंग गडकरी यांच्यासह पदाधिकारी व मान्यवर उपस्थित होते.

बातम्या आणखी आहेत...