आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराराज्यातील काैशल्य प्रशिक्षण कार्यक्रम (व्हीटीपी) संस्थांच्या दीर्घकाळ प्रलंबित असलेल्या अडचणी प्राधान्याने सोडविल्या जातील असे आश्वासन कौशल्य विकास व आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी महाराष्ट्र चेंबरच्या शिष्टमंडळाला आज नाशिक येथे दिले.
या संस्थांचा अभ्यासक्रम अंतिम करण्यासाठी राज्यस्तरीय समितीची स्थापना करण्यात येईल व महाराष्ट्र चेंबर या समितीचा स्थायी सदस्य असेल, तसेच व्हीटीपी संस्थांच्या समस्या सोडविण्याकरिता कौशल्य विकास विभागासमवेत संयुक्त बैठक आयोजित करून व्हीटीपी संस्थांच्या अडचणी प्राधान्याने सोडविण्यात येईल असेही टाेपे यांनी स्पष्ट केले.
महाराष्ट्र चेंबरचे शिष्टमंडळ, अध्यक्ष ललित गांधी यांच्या नेतृत्वाखाली, कौशल्य विकास व आरोग्य मंत्री राजेश टोपे यांना भेटले. व्हिटीपी संस्थांच्या अडचणी त्यांनी यावेळी प्रकर्षाने मांडल्या. याप्रसंगी महाराष्ट्र चेंबरतर्फे झालेल्या राज्यस्तरीय कौशल्य विकास परिषदेचा अहवाल अध्यक्ष ललित गांधी यांनी आरोग्य व कौशल्य विकास मंत्री राजेश टोपे यांच्याकडे सादर केला.
गांधी यांनी महाराष्ट्र चेंबरच्या कौशल्य विकास समिती व महिला समितीच्या माध्यमातून संपूर्ण राज्यात कौशल्य विकासाकरिता वेगवेगळे कार्यक्रम, कार्यशाळा राबवण्यात येत असल्याचे गांधी यांनी सांगितले. तसेच महिलांकरीता कौशल्य विकास व उद्योजकता विकास प्रशिक्षण उपक्रम राबविण्यात येत असून महिला क्लस्टरची निर्मिती करण्यात येणार असल्याचे सांगितले. शिष्टमंडळात उपाध्यक्ष रवींद्र माणगावे, महिला समितीच्या चेअरपर्सन संगीता पाटील, स्वप्निल शाह, प्रभारी सरकार्यवाह सागर नागरे होते.
या अडचणीकडे वेधले मंत्र्यांचे लक्ष
संस्थांची देयके 2017 पासून प्रलंबितअसुन ती अदा करावी, लाभार्थ्यांच्या प्लेसमेंटसाठी मुदतवाढ मिळावी, परीक्षा वेळेवर घेण्यात याव्यात व निकाल वेळेवर अपलोड करण्यात यावा, करोना काळामध्ये संस्था बंद असताना संस्थांना कारणे दाखवा व कारवाईच्या दिलेल्या नोटीसांवरील कारवाई स्थगित करून त्यावर मार्ग काढावा, संस्थांना एकच नोंदणी प्रक्रिया निश्चित करण्यात यावी व त्याचे प्रशिक्षण देण्यात यावे आदि अडचणी मांडून कौशल्य विकास प्रभावीपणे होण्यासाठी व्हीटीपी संस्थांच्या अडचणी सोडविण्याची मागणी यावेळी केली गेली.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.