आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

थेट आवाहन:ठाकरेंच्या 19  बंगल्यांचा  हिशेब घेणारच : साेमय्या

नाशिकएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

काेकणात ठाकरे कुटुंबियांनी १९ बंगले घेतले. उद्धव ठाकरे यंानी पत्नीच्या नावाने एॅग्रिमेंंट केले, अर्ज केला. प्राॅपटी घेतली मात्र आयकर विभागाला त्याची माहिती दिली नाही. त्यामुळे त्यांची चाेरी पकडली गेली. ठाकरे कुंटुबियंानी त्या १९ बंगल्यांचा हिशाेब देणे गरजेचे आहे. त्या गायब केलेल्या बंगल्यांचा हिशाेब घेतल्याशिवाय शांत बसणार नाही, असे उद्धव ठाकरे यांना थेट आवाहन भाजपचे नेते व माजी खासदार किरीट साेमय्या यांनी दिले.

माध्यंदिन ब्राह्मण समाजाच्या सुवर्ण महाेत्सवाच्या सांगता समारंभास किरीट साेमय्या प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित हाेते. यावेळी त्यंानी माध्यमांशी संवाद साधला. त्यावेळी त्यांनी सांगितले की कोरोना काळात केलेल्या खरेदीची चाैकशी करण्यात मुंबई पालिका आयुक्तांना काेणाची भीती वाटते. मुंबई पालिकेने काेराेना काळात केलेल्या सर्व खरेदीची ऑडिट करावेच लागणार आहे. मुंबईच्या तत्कालीन महापौर किशोरी पेडणेकर व संजय राऊत यांचे निकटवर्तीय सुजित पाटकर यांनी खाेट्या कंपनी स्थापन करत १०० कोटी रुपयांचे ठेका मिळविला, असा आरोप सोमय्यांनी केला.

बातम्या आणखी आहेत...