आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

चौकाचे सुशोभीकरण:ठक्कर बाजार चौकाला राेटरीची झळाळी ; शहरातील चाैक सुशाेभीकरणात उचलली सामाजिक जबाबदारी

नाशिक4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

महापालिका वेगवेगळे चौक सुशोभीकरण करत असून यात आता रोटरी क्लब ऑफ नाशिकनेही सामाजिक जबाबदारी उचलली आहे. ठक्कर बाजार चौकाला राेटरीकडून झळाळी मिळणार आहे. एबीएच डेव्हलपर्सच्या सहकार्याने या चौकाचे सुशोभीकरण करण्यात येणार आहे.

रोटरीच्या वतीने शहरातील मध्यवर्ती ठक्कर बाजारसमोरील चौकाचे सुशोभीकरण करण्यात येणार आहे. या जागेचे रोटरी क्लबचे प्रांतपाल आनंद झुनझुनवाला, एबीएच डेव्हलपर्सचे गाेपाल अटल व डी. जे. हंसवाणी, इलेक्ट गव्हर्नर आशा वेणुगोपाल, माजी प्रांतपाल दादा देशमुख, रोटरी क्लबचे अध्यक्ष सीए प्रफुल्ल बरडिया, सचिव ओमप्रकाश रावत आदींच्या उपस्थितीत भूमिपूजन करण्यात आले. महापालिका आयुक्त चंद्रकांत पुलकुंडवार, शहर अभियंता शिवकुमार वंजारी, राजेंद्र आहेर आदींनी या उपक्रमाला सहकार्य केले.

बातम्या आणखी आहेत...