आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

व्यापाऱ्यास अटक:85 कोटींच्या बोगस बिल प्रकरणात ठाण्याच्या भंगार व्यापाऱ्यास अटक

नीलेश अमृतकर | नाशिक12 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

शहरातील भंगार मालाच्या व इतर स्टील विक्री करणाऱ्या व्यापाऱ्यांना सुमारे ८५ काेटींची वस्तू विक्री केल्याची बनावट बिले देऊन त्यापोटी १३ काेटींचा जीएसटी परतावा घेणाऱ्या ठाणे येथील युनायटेड स्टील टेड्रर्सचा मालक फारुख रहीम खान यास नाशिक जीएसटी विभागाने अटक केली. दरम्यान, खान याने नाशिकच्या ज्या व्यापाऱ्यांना बिले दिली त्यांची चाैकशी सुरू असून आणखी काही व्यापाऱ्यांनी त्यास मदत केल्याचे चाैकशीत निष्पन्न झाल्याने तेही पथकाच्या रडारवर आहेत.

नाशिक कार्यालयाकडून सुमारे १३ काेटींचा परतावा मिळवणाऱ्या संशयित फारुख खान (रा. ठाणे) याने कार्यालयात सादर केलेली खरेदी व विक्रीची देयके आणि शहरातील भंगार मालाचे व्यापारी, स्टील विक्री करणाऱ्या व्यापाऱ्यांना माल विक्री केल्याचे बिल संशयावरून तपासणी करण्यात आली. यामध्ये बहुतांश बिलांवर ज्या व्यापाऱ्यांची नावे,त्यांची फर्म बघितली असता ती प्रत्यक्षात दुसऱ्याच्याच नावाने आढळून आली. काही व्यापाऱ्यांनी असा कुठलाही माल खान याच्याकडून खरेदी केलेला नसल्याचे व त्याची युनायटेड नावाची कंपनीही बाेगस असल्याचे उघडकीस आले. या अनुषंगाने खान यास चौकशीसाठी कार्यालयात बोलावले असता त्याने उलटसुलट माहिती देताच संशय बळावला व योग्य कागदपत्रे सादर न केल्याने त्यास साेमवारी (१ ऑगस्ट) अटक करण्यात आली. त्यापाठोपाठ प्रथम वर्ग न्यायदंडाधिकाऱ्यांच्या समाेर हजर केले असता १२ आॅगस्ट पर्यंत न्यायालयीन काेठडी सुनावली.

बातम्या आणखी आहेत...