आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराशिवकार्य गडकोट संवर्धन संस्थेची अखंडित १६७ वी दुर्गसंवर्धन मोहीम किल्ले रामशेजवर झाली. या मोहिमेत भर उन्हात दुर्गसंवर्धकानी किल्ल्याच्या मध्यभागी असलेल्या दोन पुरातन पाण्याच्या टाक्यांतील गाळ काढला. बाजूलाच असलेल्या झुडपात दडलेल्या शस्रगाराच्या वास्तूला झुडुपमुक्त केले. दुपारच्या सत्रात सैनिकी जोत्यांतील झाडांना पाणी घालण्यात आले, किल्ल्यावर येणाऱ्या दुर्गप्रेमींना रामशेजची माहिती देण्यात आली. किल्ला बघण्याचे तंत्र सांगितले.
शिवकार्य गडकोट संवर्धन संस्था गेल्या २३ वर्षांपासून नाशिकच्या ६० हून अधिक किल्ल्यांच्या दुर्गसंवर्धन मोहिमांसोबत किल्ले रामशेजच्या संवर्धनासाठी अखंडित राबत आहे. आत्ताच्या या माेहिमेत रामशेजच्या माथ्यावर असलेला जुना जीर्ण ध्वज काढून नवा भगवा ध्वज लावण्यात आला. दुर्गसंवर्धन व दुर्गजागृती अशी ही मोहीम निरंतर सुरू आहे. या मोहिमेत शिवकार्य गडकोट संवर्धन संस्थेचे श्रमदान समितीचे भूषण औटे पाटील, सल्लागार संजय झारोळे, वैभव मावळकर, वैभव पाटील, राम पाटील यांसारख्या अनेक दुर्गसंवर्धकांनी श्रमदानात भाग घेतला.
एेतिहासिक पाऊलखुणा जपण्यासाठी प्रयत्न किल्ले रामशेज मराठ्यांच्या अजिंक्य लढ्याचे प्रतीक आहे. किल्ल्यावरील प्रत्येक ऐतिहासिक पाऊलखुणा दोन दशकांपेक्षा अधिक काळ श्रमदानातून अभ्यासात्मक संवर्धन करण्याचे काम सातत्याने संस्था करीत आहे, किल्ल्याच्या माथ्यावर दडलेल्या बुजलेल्या अनेक ऐतिहासिक पाऊलखुणा शोधून त्यांना दुर्गप्रेमींना अभ्यासता याव्यात अशा पद्धतीने जोपासत आहोत. १७ पाण्याच्या टाक्या स्वच्छ व गाळमुक्त तर चुन्याचा घाणा, चोरखिंड, गोमुखी द्वार, टेहळणी बुरुज, मुख्य द्वार, तट बुरुजांच्या पाऊलखुणा स्वच्छ केल्या असल्याचे संस्थेचे संस्थापक राम खुर्दळ यांनी सांगितले.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.