आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

23 वे राज्यस्तरीय ग्रामीण साहित्य संमेलन:5 व  6 नोव्हेंबरला नाशिकमध्ये होणार, साहित्यिकांचा भरणार मेळा

नाशिक23 दिवसांपूर्वी
 • कॉपी लिंक

महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ, मुंबई आणि इगतपुरी तालुका साहित्य मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने २३ वे राज्यस्तरीय ग्रामीण साहित्य संमेलन शनिवार (दि. ५) व रविवार (दि. ६) या काळात धनलक्ष्मी शाळा प्रांगण, पाथर्डी फाटा, नाशिक येथे हाेत आहे. या संमेलनाला मान्यवर साहित्यिकांची उपस्थिती असणार आहे. तसेच कवीसंंमेलन, परिसंवाद, कथाकथन आणि पुरस्कार वितरण अशा विविध माध्यमातून यावेळी साहित्य मंथन हाेणार असल्याची माहिती संमेलनाचे स्वागताध्यक्ष गाेरख बाेडके, पुंजाजी मालुंजकर यांनी दिली.

असे हाेणार संमेलन

 • शनिवार दि. ५ नाेव्हेंबर : दुपारी १ वाजता ग्रंथदिंडी
 • दुपारी २.३० वा. उद्घाटन साेहळा
 • ज्येष्ठ साहित्यिक, कवी लक्ष्मण महाडीक यांच्या हस्ते उद्घाटन
 • संमेलनाचे अध्यक्ष उत्तम कांबळे यांच्यासह विनाेद गाेरवाडकर, संजय वाघ, दिलीप पवार, प्रकाश काेल्हे, रवींद्र मालुंजकर यांची उपस्थिती
 • दुपारी ४ वा. संत साहित्यातील चिरंतन मूल्ये या विषयावर हभप वैजयंती सिन्नरकर यांचे व्याख्यान
 • दुपारी ४.३० वा. कवयित्री ऋता ठाकूर यांच्या अध्यक्षतेखाली निमंत्रित कवींचे संमेलन.

यात कवी संदीप जगताप, विष्णू थाेरे, राज शेळके, तुकाराम धांडे, अलका दराडे, माणिकराव गाेडसे, अमाेल चिने, किरण भावसार, प्रा. सुमती पवार, विजयकुमार मिठे, प्रशांत केंदळे, मुकुंद ताकाटे, राजेंद्र उगले यांचा सहभाग.

 • सायं. ६ वा. पुंजाजी मालुंजकर यांच्या संसार मातीचा या काव्यसंग्रहाचे विवेक उगलमुगले यांच्या हस्ते प्रकाशन
 • सायं. ७ वा. ज्येष्ठ लेखक दत्तात्रय झनकर यांचा सन्मान

रविवार दि. ६ नाेव्हेंबर

 • सकाळी ९.३० वा. आनंदी जीवनाची गुरुकिल्ली या विषयावर प्रा. राजेश्वर शेळके यांचे व्याख्यान
 • सकाळी १० वा. साहित्यातील बदलते समाजजीवन या विषयावर विजयकुमार मिठे अलका मालुंजकर, पुजांजी मालुंजकर यांच्या सहभागात परिसंवाद
 • सकाळी ११ वा. पुरस्कार वितरण
 • दुपारी १२ वा. संमेलनाध्यक्ष उत्तम कांबळे यांचे मनाेगत
 • दुपारी २ वा. कथाकथन
 • दुपारी ३ वा. खुले कवी संमेलन
 • सायं. ५ वा. अ‌ॅड. रतनकुमार इचम, हिरामण शिंदे, रवींद्र पाटील यांच्या उपस्थितीत समाराेप.

यांचा हाेणार सन्मान​​​​​​​

जीवनगाैरव - यशवंत पाटील

ज्ञानदूत- प्रकाश काेल्हे

काव्यरत्न- राजेंद्र साेमवंशी

सामाजिक कृतज्ञता- भगिरथ मराडे

समाजमित्र- ज्याेती केदारे

सर्वतीर्थ - सावळीराम तिदमे

अक्षरदूत-सुभाष सबनीस

ज्ञानसाधना - गजश्री पाटील

कलारत्न - ज्विनाेद सानवणे

साहित्य सन्मान - संजय वाघ

बातम्या आणखी आहेत...