आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

राष्ट्रीय सूर्यनमस्कार स्पर्धांना उत्साहात प्रारंभ:पंजाब, गुजरात, उत्तर प्रदेशसह देशभरातील 172 खेळाडूंचा सहभाग

नाशिक3 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

महाराष्ट्र सूर्यनमस्कार असोसिएशन, अखिल भारतीय मराठा महासंघ, नाशिक आर. डी. फाऊंडेशन आणि जिल्हा सूर्यनमस्कार असोसिएशन, नाशिक यांच्या संयुक्त विद्यमाने नाशिक येथे 5 व्या राष्ट्रीय सूर्यनमस्कार स्पर्धांना मोठ्या उत्साहात सुरवात झाली. स्पर्धेत पंजाब, दिल्ली, कर्नाटक, गुजरात, छत्तीसगड, मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश आदी राज्यांच्या 172 खेळाडूंनी सहभाग घेतला आहे.

उद्घाटनाच्या वेळी खेळाडूंनी सुंदर प्रात्यक्षिके सादर केली. यानंतर सांघिक सूर्यनमस्काराच्या स्पर्धांना सुरवात करण्यात आली. दोन-दोन खेळाडूंच्या सूर्यनमस्कार स्पर्धांना सुरवात होईल, अशी माहिती आयोजकांनी दिली. स्पर्धेचे उद्घाटन अशोक कदम, आनंद खरे, दिपक पाटील, राम पाटील, नितीन हिंगमिरे, अखिल भारतीय सूर्यनमस्कार असोसिएशनचे अध्यक्ष शरद ठाकूर, दिल्ली सचीव दीपा चव्हाण, पंजाबचे मोहित शर्मा यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाले.

यावेळी बोलतांना अशोक कदम यांनी सांगितले की, सूर्य नमस्कार हा सर्व खेळांचा पाया आहे. सर्व खेळाडूंना याचा मोठा फायदा होतो. त्यामुळे खेळाडूंनी याचा चांगला सराव करून प्रावीण्य मिळवावे. यावेळी आनंद खरे, दिपक पाटील, नितीन हिंगमिरे, डॉ. पांडुरंग रणमाळ, शरद ठाकूर ( पंजाब) आदींनी मनोगत व्यक्त करून खेळाडूंना शुभेच्छा दिल्या. स्पर्धेच्या आयोजनासाठी दिपक निकम, नितीन हिंगमिरे यांच्या मार्गदर्शनाखाली प्रवीण घोगरे, भूषण भाटे, अविनाश वाघ, ऋषिकेश रसाळ आदी प्रयत्नशील आहेत.

बातम्या आणखी आहेत...