आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करा१४ वर्षांपासून फरार असलेला संशयित आरोपीने नांदेडमध्ये पोलिस भरतीपुर्व प्रशिक्षण केंद्र सुरु केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. विशेष म्हणजे या केंद्रात सध्या ९० पेक्षा जास्त तरुण प्रशिक्षण घेत आहे. संशयिताला पंचवटी पोलिसांनी अटक केली आहे. संतोष चंद्रभान मुळे असे या संशयिताचे नाव आहे. त्याला न्यायालयाने चार दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे.
याबाबत पोलिसांनी सांगितले की, पंचवटी पोलिस ठाण्यात २८ मे २००८ रोजी लक्ष्मण राजोळे यांनी प्रथम आरोपीविरोधात तक्रार दिली होती. त्यानुसार, संशयित संतोष मुळे याने महापालिका, जिल्हा परिषद आणि शासकीय विभागात नोकरी लावून देण्याचे अमिष देत बेरोजगारांना सुमारे ५१ लाखांना गंडा घातला होता. गुन्हा दाखल झाल्यापासून संशयित फरार झाला होता. संशयिताने नांदेड जिल्ह्यातील किनवट तालुक्यातील गोकुंदा गावात पाटील अकादमी पोलिस भरतीपुर्व प्रशिक्षण केंद्र सुरु केल्याचे आढळल्यानंतर पोलिसांनी कारवाई केली. वरिष्ठ निरिक्षक डॉ.सिताराम कोल्हे यांच्या मार्गदर्शनाखाली निरिक्षक विलास गिसाडी यांनी ही कारवाई केली.
पदव्युत्तरपर्यंत शिक्षण आरोपीचे शिक्षण नाशिकमध्ये झाले असून त्याने एमएससी इलेक्ट्रॉनिकचे शिक्षण घेतले आहे. तो मूळचा कर्जत, अहमदनगर येथील आहे. क्रांतीनगर पंचवटी येथे तो भाडेतत्वाने राहत होता.
१४ वर्षापासून होता फरार झटपट श्रीमंत होण्यासाठी आरोपीने बेरोजगारांना गंडा घातला. गुन्हा दाखल होणार असल्याचे समजताच शहरातून गाशा गुंडाळून आरोपी अहमदनगर येथे मुळगावी पळून गेला. पुढे नांदेडमध्ये जाऊन त्याने एका अकादमीमध्ये प्रशिक्षक म्हणून काम केले. सात वर्षांपुर्वी कालांतराने त्याने पाटील पोलिस भरतीपुर्व पोलिस प्रशिक्षण केंद्र सुरु केले.
अशी मिळाली माहिती तक्रारदार राजोळे यांनी संशयिताची माहिती मिळवली. पंचवटी पोलिसांना याबाबत कल्पना दिली. निरिक्षक विलास गिसाडी यांच्या पथकाने नांदेड पोलिसांच्या मदतीने संशयिताचा माग काढला. प्रशिक्षण केंद्रात संशयिताला अटक केली. येथे तो संतोष मुळे पाटील नावाने वावरत होता
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.