आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सिन्नर तालुक्यात 3 गायींना लम्पीची लागण:प्रशासनाला गायींवर उपचार करण्यास आले यश; 9 गावांमधील 5400 जनावरांचे लसीकरण पूर्ण

नाशिक24 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

जगभरात लम्पी चार्म या आजाराची साथ चालू आहे. अशातच नाशिक येथील सिन्नर तालूक्यातील 3 गायींना या लम्पी आजाराची लागण झाली आहे. या गायींचे नमुने पॉझीटिव्ह येताच जिल्हा परिषद प्रशासनाने बाधित झालेल्या दोन्ही गावांच्या 5 किलो मीटर त्रिज्येत येणाऱ्या 9 गावातील 5400 जनावरांचे लसीकरण शनिवारी सायंकाळपर्यंत पूर्ण केल्याने जिल्ह्यात या रोगाचा प्रसार होण्याची धुसर झाली आहे.

राज्यातील जळगांव, अहमदनगर, अकोला, पुणे, धुळे, लातूर, औरंगाबाद, बीड, सातारा बुलढाणा, अमरावती, उस्मानाबाद, सांगली, सोलापूर, कोल्हापूर सह नाशिक जिल्ह्यातील सिन्नर भागात सद्यस्थितीत गाय वर्गीय पशुधनामध्ये लम्पी चर्मरोगाचा प्रादुर्भाव झाल्याचे निष्पन्न झाले आहे.

यामुळे होता लम्पी आजार

जनावरांमध्ये होणाऱ्या लम्पी स्किन रोगाचा फैलाव बादा किटकांद्वारे (मच्छर, गोचीड, गोमाश्या तसेच आजारी पशुंच्या त्वचेवरील व्रणामधून वाहणारा स्थाय दूध, लाल, वीर्य इतर स्वामुळे) होतो. त्यामुळे पशुपालकांनी मच्छर, गोचीड व गोमाश्या यांचा प्रादुर्भाव होणार नाही याची दक्षता घ्यावी असे आवाहन जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त डॉ. बी. आर. नरवाडे व जिल्हा परिषदेचे जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी डॉ. विष्णू गर्जे यांनी केले आहे. दरम्यान जिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापनाचे अध्यक्ष गंगाधरन डी. यांनी सिन्नर तालुक्यातील मौजे पांगरी (बु) व दुसंगवाडी या दोन संसर्ग केंद्रापासून 10 कि.मी. बाधित क्षेत्र म्हणून घोषीत केले आहे. त्याअनुषंगाने बाधित क्षेत्रातील जनावरांचे शेड निर्जंतुकीकरण करून 10 कि.मी. परिघाच्या परिसरात जनावरांची खरेदी विक्री, वाहतूक बाजार व जत्रा प्रदर्शन आयोजित करण्यास प्रतिबंध घातला आहे. तसेच बाधित क्षेत्रातील ५ कि.मी. परिघातील जनावरांना गोट पॉक्स लसीकरण करण्याच्या सूचना दिल्या आहेत.

अशी आहेत लक्षणे

लम्पी स्किन बाधित पशुमध्ये ताप येणे, त्वचेवर 10 ते 20 व्यासाच्या गाठी येणे, भूक कमी होणे, अशक्तपणा, वजन कमी होणे, दूध उत्पादन कमी होणे. काही वेळा फुफ्फुसदाह किंवा स्तनदाह होणे, पायावर सूज येणे, गाभण जनावरांमध्ये गर्भपात होणे अशी लक्षण दिसून येतात. मात्र उपचाराने दोन ते तीन आठवड्यात पशु बरी होतात.

एका जिल्ह्यातून दुसऱ्या जिल्ह्यात वाहतूक करणे धोक्याचे

एका राज्यातून दुसऱ्या राज्यात व एका जिल्ह्यातून दुसऱ्या जिल्ह्यात बाधित जनावरांची वाहतूक केल्यामुळे बाधित जनावरांपासून निरोगी जनावरांना या रोगाचा प्रादुर्भाव होण्याची दाट शक्यता आहे. हा रोग सांसर्गिक असल्याने या रोगाचा प्रसार होऊ नये महणून प्रतिबंधात्मक उपाय योजना तात्काळ अंमलात आणणे आवश्यक आहे.

बातम्या आणखी आहेत...