आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शोची धमाल:माय एफएमच्या आरजे अपूर्वसोबत दुपार होईल सुपर एनर्जेटिक; ‘यारी-दोस्ती’ या नव्या कोऱ्या शोची धमाल

नाशिक19 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

दुपारची वेळ अत्यंत कंटाळवाणी असते, मुलं शाळेत गेल्यावर गृहिणी कंटाळतात, ऑफिसमध्ये बॉसच्या कामांचा वीट आलेला असतो, ट्रॅफिकमध्ये अडकलेले हॉर्नच्या आवाजाने कंटाळतात, तर सोशल मीडियावरही त्याच त्या गोष्टी समोर येत असतात. पण आता हे सगळं विसरा, तुमचं मनोरंजन करयला रेडिओ हैं ना! आता या दुपारच्या तुमच्या दिवसातील सगळ्यात हॅप्पी टाइम बनवण्यासाठी १०४.२ माय एफएमवर आरजे अपूर्व घेऊन येत आहे एक नवा कोरा शो ‘यारी-दोस्ती’!

आता आपल्या कारमध्ये व्हाॅल्यूम अप करा किंवा घरबसल्या कानांमध्ये हेडफोन्स लावून एन्जॉय करा यारी-दोस्ती. कारण आरजे अपूर्व तुमची दुपार सुपर हॅप्पी करण्यासाठी ‘यारी-दोस्ती'मध्ये घेऊन येत आहे ट्रेंडिंग न्यूज, कवितांचा कट्टा, थोडेसे गॉसिप्स, खूप साऱ्या कॉन्टेस्ट, बॉलिवूडच्या गप्पा, तुम्हाला माहीत नसलेले फॅक्टस्, मुव्ही ट्रिव्हिया, ९० च्या दशकातील काही खास आठवणी, सोशल मीडिया वरची टेंडिंग धुमश्चक्री, घरगुती जेवणाच्या काही खास रेसिपी, कॉलेज कट्ट्यावरच्या गप्पा, नवीन वेबसिरीजवर चर्चा, नाशिकच्या काही खास गोष्टी आणि बरंच काही आपल्या ‘यारी-दोस्ती’ शोमध्ये... सोमवार ते शनिवार, १३ जूनपासून सकाळी १२ ते ४ दरम्यान. ऐकायला विसरू नका ‘यारी-दोस्ती’ आरजे अपूर्वसोबत... ट्यून इन करा, १०४.२ माय एफएम, चलो आज कुछ अच्छा सुनते है... असे आवाहन प्रेक्षकांना करण्यात आले आहे.

या यारी-दोस्तीच्या फुल तू हॅप्पी पॅकेजमध्ये मनसोक्त आनंदाचे सूर मारा, धमाल करा, बाेला, गप्पा मारा आणि अपूर्वसोबत आपल्या दुपारच्या वेळेला खास बनवा.

बातम्या आणखी आहेत...