आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भाजपचे काँग्रेसवर टीकास्त्र:राहुल गांधींच्या बचावासाठी आंदोलन म्हणजे काँग्रेस विसर्जनाचा महोत्सवच

नाशिक13 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक
संग्रहित छायाचित्र - Divya Marathi
संग्रहित छायाचित्र

राहुल गांधीच्या बचावासाठी आंदोलन म्हणजे काँग्रेसच्या विसर्जनाचा महोत्सव अशा शब्दात नाशिक भाजपचे शहराध्यक्ष गिरीष पालवे यांनी आज टिका केली.

शहर काॅंग्रेसतर्फे गेल्या तीन दिवसांपासून सुरू असलेले राहूल गांधी यांच्या समर्थनार्थ आंदोलन भाजपला चांगलेच खटकले आहे. या आंदोलनावरुनच आता भाजपच्या स्थानिक नेत्यांनी टीकास्त्र सोडले जात आहे. राहूल गांधींच्या समर्थनार्थ होत असलेल्या आंदाेलनावर भाजपा पदाधिकाऱ्यांनी पत्रकाद्वारे निषेध नाेंदिवत आपला खटाटोप सुरुच ठेवला आहे.

देशातील स्वातंत्र्यसैनिकांनी स्थापन केलेल्या असोसिएटेड जर्नल लि. कंपनीची दोन हजार कोटींची मालमत्ता हडप केल्याचा आरोप राहूल गांधी यांच्यावर केला जात असून या परिवाराच्या बचावासाठी रस्त्यावर उतरून यंत्रणांवर दबाव आणण्यासाठीच काँग्रेस कार्यकर्त्यांचे आंदाेलन असून ते दिशाभूल करणारे आंदोलन आहे. भ्रष्टाचाराला पाठीशी घालणाऱ्या या आंदोलनामुळे काँग्रेसचा खरा चेहरा देशासमोर आला आहे असेही पालवे यांचे म्हणणे आहे.

जनतेची दिशाभूल

राहुल गांधी यांना ‘ईडी’ने पाचारण करताच भीतीने काँग्रेसच्या मरगळलेल्या कार्यकर्त्यांनी रस्त्यावर येऊन यंत्रणांवर दबाव आणण्याकरिता आंदोलन करून जनतेस वेठीस धरण्याचा उद्योग चालविला आहे असेही गिरीश पालवे यांचे म्हणणे आहे.

बातम्या आणखी आहेत...