आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गंभीर इजा:मद्यपींनी श्वानाला 25 फुटावरून खाली फेकले, पायाला गंभीर इजा

सिडकोएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

मद्यपान केल्यावर टवाळखोरांच्या डोक्यात वेगळीच हवा घुसते याचा प्रत्यय सिडकोतील त्रिमूर्तीचौक येथे नागरिकांनी अनुभवला. मद्य सेवन केलेल्या टवाळखोरांनी एका श्वानाला चक्क २५ ते ३० फुटावरून खाली फेकल्याची संतापजनक घटना रविवारी सायंकाळी घडली.

काही नागरिकांनी हा प्रकार बघताच एका मध्यपीला चोप दिला. तर यातील काही मध्यपींनी नागरिकांनाच शिवीगाळ केली. या प्रकाराने दुर्गानगर रस्त्यावर गर्दी जमा झाली होती. घटनेत श्वान गंभीर जखमी झाला असून त्याचा पाय तुटला आहे. प्राणीमित्र पुरुषोत्तम आव्हाड यांना माहिती मिळताच घटनास्थळी धाव घेत श्वानाला दवाखान्यात नेत त्याच्यावर उपचार सुरू केले.

बातम्या आणखी आहेत...