आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराओळखीचा फायदा घेत एका शेअर्स ब्रोकर्सने पुणे येथील महिलेला आईच्या उपचारासाठी पैशांची तरतूद करुन देण्याचे अमिष दाखवत शेअर्स मार्केटमध्ये पैसे गुंतवणूकीस भाग पाडले आणि महिलेसह त्यांच्या नातेवाईकांचे डीमॅट खाते उघडून 62 लाख रुपयांची फसवणूक केली.
गुरुवारी (ता. 2) संशयित ब्रोकर प्रसन्नकुमार नानाजी जगदाळे यांच्या विरोधात सरकारवाडा पोलिस ठाण्यात फसवणूकीचा गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिसांच्या आणि स्मिता शिवरकर (रा. सासवड पुणे) यांच्या माहितीनूसार, प्रसन्नकुमार जगदाळे याची महिलेची ओळख आहे. ऑगस्ट 2018 ते 31 ऑगस्ट 2021 या कालावधीत शरणपुररोड येथे असतांना संशयिताने ओळखीचा फायदा घेत शिवरकर यांच्या आईच्या आजारपणासाठी पैशांची तरतूद करण्याचे आमिष दाखवले. तसेच लग्न करण्याचे सांगत नवीन फ्लॅटमध्ये आईला सांभाळू असेही आश्वासन देत शिवरकर यांच्याकडून पैसे घेतले तसेच शेअर्स मार्केट मध्ये पैस गुंतवणूक केल्यास आईच्या उपचारासाठी मोठी रक्कम जमा होईल असे आमिषही दाखवले.
शेअर मार्केट गुंतवणूकीस भाग पाडले
महिलेला मोठी रक्कम शेअर्स मार्केट मध्ये गुंतवणूक करण्यास संशयिताने भाग पाडले. तसेच आई आणि मावशी यांचेही डिमॅट खाते सुरु करत त्यांच्या खात्यावर रक्कम डिपाॅझिट करण्यास सांगीतली. शेअर्स मार्केट मध्ये गुंतवणूक मध्ये तोटा झाला असल्याचे माहिती असतानाही 50 लाखांचा नफा झाल्याचे सांगत ब्रोकरेजचे 19 लाख 97 हजार रुपये खात्यातून काढून घेतले.
डिसेंबर 2018 ते जानेवारी 2019 मध्ये शेअर्स मार्केट मध्ये गुंतवणूक न करता त्या रक्कमेचा फ्लॅट खरेदी करुन तो फिर्यादीच्या नावावर केला नाही. वारंवार पैशांची मागणी केली असता पैसे देण्यासही संशयिताने नकार दिली आणि एकूण 62 लाख 46 हजारांची फसवणूक केली.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.