आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पाण्याचा अपव्यय:जलवाहिनी फुटली; अंबडचा पाणीपुरवठा ठप्प

सातपूर2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

नाशिक त्र्यंबकराेडवरील पपया नर्सरीजवळ महाराष्ट्र नॅचरल गॅस लिमिटेड कंपनीची पाइपलाइन टाकण्याचे काम सुरू असताना अंबड आैद्याेगिक वसाहतीला पाणीपुरवठा करणारी एमआयडीसीची जलवाहिनी फुटून सुमारे पाच लाख लिटर पाण्याचा अपव्यय झाला.

एमएनजीएलकडून काेणत्याही प्रकारची चाचणी न घेता घाईने काम उरकण्यासाठी थेट माेठ्या यंत्रांचा वापर हाेत असल्यामुळे ही घटना घडल्याचे बाेलले जात आहे. शनिवारी रात्री ही घटना घडली. या घटनेमुळे रात्रीची वाहतूक खाेळंबली हाेती. तसेच अंबड एमआयडीसीचा पाणीपुरवठा विस्कळीत झाला हाेता.

महाराष्ट्र नॅचरल गॅस कंपनीकडून गॅस पाइपलाइन टाकण्याचे काम शहराच्या विविध भागांमध्ये सुरू आहे. मात्र हे काम करताना संबंधित विभागाच्या यंत्रणेकडून काेणत्याही प्रकारचे नियाेजन केले जात नसल्याचे वारंवार घडणाऱ्या घटनांमधून स्पष्ट हाेत आहे. पपया नर्सरी लगतच्या पेट्राेलपंपासमाेरील नाशिक- त्र्यंबक या मुख्य रस्त्यावर गॅसच्या क्राॅसिंग लाइनचे काम सुरू हाेते.

हे काम सुरू असताना काेणत्याही प्रकारचा अभ्यास न करता थेट माेठ्या यंत्राद्वारे खड्डा तयार करण्याच्या नादात एमआयडीसीची पाइपलाइन फुटली. त्यामुळे रस्त्यावरून पुराच्या पाण्याप्रमाणे पाणी वाहत हाेते. या घटनेमुळे रात्रीपासून दुसऱ्या दिवशी उशीरापर्यंत अंबड आैद्याेगिक वसाहतीतील पाणीपुरवठा विस्कळीत झाला.

एमआयडीसीने केला हाेता इन्कार : जलवाहिनी फुटल्यानंतर महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाच्या अधिकाऱ्यांनी त्वरित घटनास्थळी धाव घेतली. मात्र संबंधित जलवाहिनी पालिकेची नसल्याचे त्यांच्या निदर्शनास आल्याने त्यांनी एमआयडीसीशी संपर्क साधला.

मात्र ही जलवाहिनी आमची नसल्याचे सांगत प्रारंभी एमआयडीसीने हात वर केले. त्यानंतर पालिकेच्या यंत्रणेने सर्व व्हाॅल्व्ह बंद केल्यानंतरही पाण्याचा प्रेशरने अपव्यय हाेत असल्याचे बघितल्यानंतर एमआयडीसीच्या अधिकाऱ्यांनी धावपळ करत त्या जलवाहिनीवरील पाणीपुरवठा बंद केला. रविवारी जलवाहिनीचे काम पूर्ण करण्यात आले.

मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी घेतली धाव : रात्रीच्या वेळी जलवाहिनी फुटल्यानंतर रस्त्यावरून पाण्याचे पाट वाहू लागले हाेते. याबाबतची माहिती काही नागरिकांनी मनसेचे नेते तथा माजी नगरसेवक सलीम शेख यांना दिल्यानंतर त्यांनी घटनास्थळी धाव घेऊन अधिकाऱ्यांना जाब विचारला.

तसेच यापुढे रस्ते खाेदताना महापालिका व एमआयडीसी कार्यालयाशी समन्वय राखूनच काम करण्याची सूचना केली. पालिका व एमआयडीसीच्या जलवाहिन्यांना खेटूनच गॅसच्या पाइपलाइन टाकणे चुकीचे आहे असे माजी नगरसेवक सलीम शेख यांनी याबाबत सांगितले.

बातम्या आणखी आहेत...