आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

राजकारणाचा संसर्ग:​​​​​​​खाटा लावल्या अन‌् गाशा गुंडाळला; भाजपच्याच गटामुळे राजराजेश्वरी कार्यालयातील कोविड सेंटर बंद

नाशिकरोड8 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • उभारले हाेते 100 बेड; 25 आॅक्सिजन काॅन्सन्ट्रेटरची सुविधा

केवळ श्रेयवाद अाणि राजकारणाच्या विकृत संसर्गामुळे तसेच येथे काेविड केअर सेंटर झाले तर अापल्या परिसरातही रुग्ण वाढतील या अविचारामुळे सध्या अत्यंत गरज असलेल्या अाणि जवळपास १०० बेड‌्सच्या तयार झालेल्या या सेंटरचा गाशा काही वेळाच गुंडाळावा लागला. ज्यांनी हे सेंटर सुरू करण्यासाठी प्रयत्न केले त्यांनीही भविष्यात बदनामी नकाे म्हणून विराेध हाेताच गाद्यांच्या वळकट्या केल्या. नाशिकराेड परिसरातील या घटनेचा वा देखाव्याचा हा लाइव्ह रिपाेर्ट...

काेराेना रुग्णांची संख्या सर्वत्र वाढतच अाहे. गृह विलगीकरणावर जरी भर असला तरी अनेकांची घरे लहान, इतर साेयीसुविधा नाहीत, कुटुंब माेठे यामुळे काेराेना केअर सेंटर महत्त्वाचे ठरतात. याच विचारातून नाशिकराेडला भाजपचे नगरसेवक विशाल संगमनेरे यांनी माजी अामदार बाळासाहेब सानप यांच्या मार्गदर्शनाखाली काेविड रुग्णांवर माेफत उपचार व्हावे यासाठी राजराजेश्वरी मंगल कार्यालयात १०० बेडचे काेविड केअर सेंटर उभे केले. महापालिकेनेही त्याला तत्काळ परवानगी दिली. यासाठी पालकमंत्री छगन भुजबळ, पालिका आयुक्त कैलास जाधव, वैद्यकीय अधिकारी बापुसाहेब नागरगोजे यांचीही परवानगी घेतली. सेंटर उभे राहिले. पलंग अाले, त्यावर गाद्या, उशा, बेडशीट‌्स टाकण्यात अाले. रुग्णांसाठी विविध साेयीदेखील करण्यात अाल्या. त्याचवेळी मात्र याच परिसरातील भारतीय जनता पार्टीच्या एका गटाने राजराजेश्वरी मंगल कार्यालयाच्या परिसरात कोविड सेंटर सुरू केल्यामुळे आपल्या भागात कोरोनाचा संसर्ग वाढू शकताे, आपले आरोग्य धोक्यात येऊ शकते असा अपप्रचार केला. त्यामुळे हतबल संगमनेरे यांनी भविष्यात दुर्दैवाने येथे एखादा रुग्ण दगावला तर हा गट राजकारण करून चांगल्या उपक्रमाची बदनामी करेल या भीतीने त्यांनी या सेंटरचा गाशा गुंडा‌ळला.

केवळ राजकारणामुळे बंद करावे लागले सेंटर
या ठिकाणी येणारे रुग्ण हे केवळ माझ्या प्रभागातीलच असतील असे नाही, तर जिल्ह्यातील कुठलेही असू शकले असते. यासाठी मी आॅक्सिजन यंत्राची सुविधा, मोफत जेवण देणार होतो. मात्र आमच्याच पक्षातील लोकांनी राजकारण करीत खोडा घातला. भविष्यात दुर्दैवाने एखादा रुग्ण दगावला तर यांनी त्यावरूनही सेंटला बदनाम केले असते. म्हणून हे सेंटर बंद करण्याचा निर्णय घेतला. - विशाल संगमनेरे, नगरसेवक

नागरिकांची नाराजी
एकाच पक्षातील राजकीय कुरघाेडी, तसेच या सेंटरमुळे भविष्यात हा प्रभागात माेठा हाेईल या विचारानेच दुसऱ्या गटाने विराेध करत हे सेंटर बंद पाडल्याची भावना नागरिकांमध्ये व्यक्त हाेत अाहे. सध्या रुग्णांचा जीव महत्त्वाचा असून राजकीय वाद महत्त्वाचे नाहीत, असेही मत नागरिकांनी व्यक्त केले अाहे.


बातम्या आणखी आहेत...