आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सोमेश्वरची घटना:स्वसंरक्षणाचा फायदा, पाेलिसांकडे केले स्वाधीन; मुलींची छेड काढणाऱ्या दोघांना भोंसलाच्या विद्यार्थिनींकडून चोप

नाशिक4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुली-महिलांच्या संरक्षणाचा प्रश्न अत्याचार, छेडछाडीच्या घटनामुळे अधिक गंभीर बनला आहे. स्वसंरक्षणाचे थोडेफार शिक्षण घेतलेले असले तर निश्चित फायदा होतो याचा प्रत्यय सोमेश्वर येथे देवदर्शनासाठी आलेल्या मुलींची छेड काढणाऱ्या दोघांना भोंसलाच्या विद्यार्थिनींनी चांगलाच चोप दिला. यावर न थांबता दोघा टवाळखोरांना पोलिसांच्या स्वाधीन केले.

भोंसला सैनिकी विद्यालयाच्या रामदंडी मुली फिरण्यासाठी रविवारी सोमेश्वरला गेल्या होत्या. सैनिकी शिक्षणाबरोबरच स्वयंशिस्त, आत्मसंरक्षणाचे धडे देऊन रामदंडीचे व्यक्तिमत्त्व कणखर, धाडसी बनवले जाते. या विद्यार्थिनी सोमेश्वरला गेल्या असता त्यांच्यासमोर पाच टवाळखोर बसलेले होते. या मुलींना पाहून त्यांनी त्यांना टोमणे मारण्यास व अपशब्द बोलण्यास सुरुवात केली. मुलींनी सुरुवातीला त्यांच्याकडे दुर्लक्ष केले, तरीही त्यांची छेडछाड सुरूच होती. त्यास आक्षेप घेताच टवाळखोर भांडायला उभे राहिले. त्यांनी मुलींना धक्के मारायला सुरुवात केली. एका मुलीवर हातही उचलल्यानंतर मात्र सर्व रामदंडींनी सांघिकतेचे दर्शन दाखवत या टवाळखोरांना बेदम चोप देण्यात सुरुवात केली. त्यातील एकाने खिशातील फोन काढत आणखी इतर मित्रांनाही बोलावले. तोच मुलींनी तातडीने १०० नंबरला कॉल करत पोलिसांना बोलावले. पोलिसांनी प्रसंगावधान राखून वेळीच घटनास्थळी धाव घेतली.

संबंधित पाचही जणांना ताब्यात घेत त्यांना या रामदंडींसमोर व इतर नागिरकांसमोर उठबशा काढायला लावत पुन्हा अशाप्रकारे वर्तन करणार नसल्याचे सांगत ताब्यात घेतले. या घटनेनंतर रामदंडी मुली तातडीने महाविद्यालयाच्या वसतिगृहाकडे परतल्या. त्यांच्या धाडसी कृतीमुळे महाविद्यालयातर्फे प्रा. एस. यू. कुलकर्णी, प्रा. प्रभावती जगताप, प्रा. आर. भोळे, प्रा. पुर्णिमा झेंडे, प्रा. हिरा वाघ, प्रा. अनिता चंद्रात्रे यांच्या हस्ते त्यांना रामदंडी हा बॅच देऊन गौरविण्यात आले. प्राचार्य डॉ. उन्मेष कुलकर्णी, कॅम्पस को-ऑर्डिनेटर प्रा. डॉ. संजय कंकरेज, मेजर विक्रांत कावळे उपस्थित होते.

बातम्या आणखी आहेत...