आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

तक्रार:दुचाकीचालकाला रस्त्यात अडवत लुटले ; पंचवटी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल

नाशिक2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

दुचाकीने जाणाऱ्यास अडवत त्याच्या पोटास चाकू लावत ५ हजारांची रक्कम लुटण्यात आली. रामवाडी ते गोदावरी पेट्रोल पंप या रस्त्यावर हा प्रकार घडला. याप्रकरणी पंचवटी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.हरी गुडनर (रा. क्रांतीनगर, मखमलाबाद रोड) यांच्या तक्रारीनुसार, गुडनर हे मुलाला गंगापूर येथे खासगी क्लासला घेऊन येण्यास जात असताना रामवाडी ते गोदावरी पेट्रोलपंप या रस्त्यावर संशयिताने दुचाकी अडवली. मदत पाहिजे म्हणून गुडनर यांनी दुचाकी थांबवली. संशयिताने चाकू पोटास लावत खिशातील ५ हजारांची रक्कम बळजबरीने काढून घेतली मी इथला भाई आहे, तू पोलिसांत तक्रार दिली तर तुझा गेम करेल, असा दम दिला.

बातम्या आणखी आहेत...