आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

हत्या:हॉर्न वाजवल्याच्या रागातून एकाची निर्घृण हत्या, लासलगाव जवळील घटना

लासलगाव10 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • रस्त्यावर वाढदिवस साजरा करत होते तरुण

लासलगाव जवळील पिंपळगाव नजीक दहा-बारा तरुण रस्त्यावर केक कापत वाढदिवस साजरा करत होते. दरम्यान रस्त्याने कार घेऊन जाणाऱ्या युवकाने हॉर्न वाजवला. याच रागातून वाढदिवस साजरा करणाऱ्या युवकांनी त्या कार चालक तरुणाशी वाद घालत वाहनचालकाची चाकू, तलवारी सारख्या हत्याराने वार करत हत्या करण्यात आली. या घटनेने लासलगाव परिसरात खळबळ निर्माण झाली आहे. 

पोलिसांनी दिलेली दिलेल्या माहितीनुसार पिंपळगाव नजीक येथे राहणारा 30 वर्षीय चेतन बाळू बैरागी हा खाजगी चार चाकी गाडीवर चालक म्हणून कामास होता. मंगळवारी रात्री साडेआठ ते नऊ वाजेच्या सुमारास तो त्याचा मित्र आकाश शेजवळ यांच्यासमवेत आपल्या घराकडे ईरटीगा कारने जात होते.

पिंपळगाव नजीक मधील इंदिरानगरच्या रस्त्यावर साहिल इम्रान शेख याचा वाढदिवस सुरू होता. यावेळी त्याच्या सोबत फिरोज अकबर शहा ,इमरान सलीम सय्यद, रोहित शिरसाट, कृष्णा वरपे ,अरुण माळी, राजू राजळे, काळू लहाने, दत्तू जाधव व इतर तिघे संशयित हे केक कापत होते. दरम्यान चेतन बैरागी याने त्याच्या गाडीचा हॉर्न वाजवल्याचा राग येऊन या सर्व युवकांनी त्यांच्याशी वाद घातला. तसेच हातातील चाकु तलवारी सारख्या हत्याराने चेतन बैरागी याच्यावर वार केले. तर त्याच्यासोबतच असणारा आकाश शेजवळ हा जखमी आहे. रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या चेतनला तातडीने उपचाराकरिता नाशिक येथे पाठविण्यात येत असतानाच रस्त्यात त्याचा मृत्यू झाला. 

चेतन हा अविवाहित असून त्याच्या घरी फक्त आई आहे. घरची परिस्थिती अत्यंत गरिबीची आहे. दरम्यान पोलिसांनी घटनेची माहिती मिळताच याठिकाणी भेट दिली. निफाडचे उपविभागीय पोलिस अधिकारी माधव रेड्डी लासलगावचे सहाय्यक पोलिस निरीक्षक खंडेराव रेल्वे यांच्यासह पोलिस कर्मचार्‍यांनी तातडीने तपास करत यातील प्रमुख आरोपी साहिल इम्रान शेख यांच्यासह अन्य चार साथीदारांना ताब्यात घेत लासलगाव पोलीस कार्यालयात खुनाचा गुन्हा दाखल केला अाहे.

बातम्या आणखी आहेत...