आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Local
  • Maharashtra
  • Nashik
  • The Burning Of A 60 foot Effigy Of Ravana; ​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​

6 दशकांची परंपरा:60 फूट रावणाच्या प्रतिकृतीचे दहन; ​​​​​​​रामकुंडासह गांधीनगर, गंगापूरराेड येथे कार्यक्रमाला नागरिकांची गर्दी

नाशिक2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

यंदा कोरोनाच्या निर्बंधातून मुक्तता झाल्यानंतर सण उत्साहात साजरे हाेत आहेत. नवरात्राेत्सवाचा समाराेपही रावणदहनाने अर्थात वाईट प्रवृत्तीच्या दहनाने उत्साहात पार पडला. पंचवटीसह नाशिकरोड, सातपूर, गंगापूररोड आणि सिडको परिसरातही रावणदहन करण्यात आले. रामकुंड आणि गांधीनगर येथे येथे ६० फुटी रावणाच्या प्रतिकृतीची दहन करण्यात आले.

गांधीनगरला ६० फुटी रावणाच्या प्रतिकृतीचे दहन करण्यात आले. यावेळी रामलीला समितीतर्फे गांधीनगर मैदानावर रामायणातील सर्व पात्रे दाखविण्यात आली. श्रीरामाची वानरसेना व रावणाची सेना यांच्या युद्धाचे प्रसंग ही यावेळी सादर करण्यात आले. तसेच रामलीलेचा समारोप झाला.

द्वारका युवा सांस्कृतिक मंडळाच्या वतीने गणेशनगर येथे ५५ फुटी रावणाचे दहन करण्यात आले. यानिमित्त लेसर शाे, फटाक्यांची आतषबाजीदेखील करण्यात आली. गंगापूरराेडवरील शिवसत्य मैदानावर ६० फुटी रावणदहन रावणदहन करण्यात आले. यावेळी या ठिकाणी ढाेलपथकाच्या वादनासह साहसी खेळदेखील सादर करण्यात आले. तर इंदिरानगर येथे युनिक ग्रुपच्या वतीने रावण दहन कार्यक्रम झाला. यावेळी नागरिक उपस्थित होते.

बातम्या आणखी आहेत...