आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

शेतकऱ्यांवर होणार अन्याय:दरवाढ हाेताच कांद्याच्या निर्यातीवर केंद्राची बंदी, भविष्यात दर तेजीतच राहणार

नाशिक4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • केंद्राने निर्यातबंदी केल्याने सोमवारी दुपारनंतर दरात क्विंटलमागे 500 रुपयांनी घसरण झाली

कांद्याच्या दरांत वाढीची शक्यता पाहून केंद्र सरकारने सोमवारी कांद्याच्या निर्यातीवर अमर्याद कालावधीसाठी बंदीचा आदेश जारी केला आहे. यामुळे दरांत लगेचच ४०० ते ५०० रुपयांनी घसरण झाली.

मागणीच्या तुलनेत बाजार समितीमध्ये आवक कमी होत असल्याने गत आठवड्यापासून पुन्हा कांदा दरवाढ होण्यास सुरुवात झाली होती. नाशिक जिल्ह्यातील पिंपळगाव बाजार समितीमध्ये सोमवारी दर कमाल ४ हजार रुपये प्रतिक्विंटल तर सरासरी २८०० तर ३००० रुपये प्रतिक्विंटल दराने विकला गेला. तेलंगण, तामिळनाडू आणि कर्नाटकमध्ये पावसामुळे ४०% कांदा खराब झाला. परिणामी महाराष्ट्रातील, विशेषत: नाशिक जिल्ह्यातील उन्हाळ कांद्याला मागणी वाढली आहे. त्यामुळे गत आठवड्यापासून दरात तेजी आली आहे.

शेतकऱ्यांवर होणार अन्याय

केंद्राने निर्यातबंदी केल्याने सोमवारी दुपारनंतर दरात क्विंटलमागे ५०० रुपयांनी घसरण झाली. त्यामुळे शेतकरी संतप्त झाले. चांगला दर मिळताच केंद्राने निर्यातबंदी करून अप्रत्यक्षपणे हस्तक्षेप केल्याने उत्पादक शेतकऱ्यांवर मात्र अन्याय होणार आहे.

भविष्यात दर तेजीतच राहणार

पावसामुळे लाल कांदा १५ ते २०% खराब झाला आहे. रांगड्या कांद्याचे रोप खराब झाल्याने उत्पादनावर परिणाम होईल. उन्हाळ कांद्याच्या बियाण्यांच्या टंचाईमुळे उत्पादन घटू शकते. त्यामुळे दर तेजीतच राहू शकतात, असे एनएचआरडीएफचे सेवानिवृत्त शास्त्रज्ञ डाॅ. सतीश बोंडे यांनी सांगितले.

पाकिस्तान घेणार संधीचा फायदा

कांदा निर्यातबंदी झाल्यानंतर पाकिस्तानातील निर्यातदार भारतीय निर्यातदारांच्या ग्राहकांशी संपर्क साधतील. त्यांना भारतापेक्षा कमी दराने कांदा विकून संधीचा फायदा घेतील. - विकास सिंग, कांदा निर्यातदार

३ राज्यांमध्ये १ लाख मेट्रिक टन खरेदी :

नाफेडतर्फे महाराष्ट्र, गुजरात आणि मध्य प्रदेशात १ लाख मेट्रिक टन कांदा खरेदीचे उद्दिष्ट होते. महाराष्ट्रात ८० एेवजी ८७, मप्रत १० ऐवजी १२, तर गुजरातमध्ये १० ऐवजी ७ हजार टन खरेदी झाली. त्यातून महाराष्ट्रातील काही कांदा विकल्याचे संचालक नानासाहेब पाटील यांनी सांगितले.

Open Divya Marathi in...
  • Divya Marathi App
  • BrowserBrowser