आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

फसवणूक:बनावट दस्तावेज तयार करून कंपनीच्या सीईओनेच केली 12 कोटींची फसवणूक

नाशिक4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

कंपनीच्या सीईअोकडूनच बनावट दस्तावेज आणि संचालक मंडळ स्थापन करत १२ कोटी ४६ लाखांची फसवणूक केल्याप्रकरणी अंबड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.पोलिसांनी दिलेली माहिती आणि विशाल गावडे (रा. चेतनानगर) यांच्या तक्रारीनुसार, अंबड एमआयडीसीत रेनबो डेको प्लास प्रा. लि. नावाची कंपनी आहे.

कंपनीतील सीईआे संशयित अजयकुमार नामदेवराव तावडे यांनी या पदाचा दुरुपयोग करत २०१७ ते २०२२ या कालावधीत स्वत:च्या नावे असलेली कलर प्लेअर कंपनी व त्यांच्या पत्नी स्वाती तावडे यांच्या नावे असलेली गुरुदेव मार्केटिंग आणि भाऊ विजय तावडे यांच्या नावे असलेली इलिना कोट‌्स या कंपनीसोबत रेनबो डेको कंपनीच्या व्यवहारासंबंधित करारनामा, प्राॅडक्टच्या विक्रीचे अधिकार नसताना बनावट दस्तावेज, जनरल मुखत्यारपत्र, धनादेश ताब्यात ठेवत अजय तावडे यांनी पत्नी, भाऊ यांच्या फायद्यासाठी आणि सचिन सातपुते यांना संचालक मंडळाने नियुक्त नेमणूक केली. बनावट दस्तावेजाद्वारे फिर्यादी गावडे आणि त्यांची कंपनी रेनबोची फसवणूक केली. वरिष्ठ निरीक्षक भगीरथ देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली तपास सुरू आहे.

बातम्या आणखी आहेत...