आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अभ्यास:अभियांत्रिकीच्या थेट द्वितीय वर्षाला महिनाभरात परीक्षा देण्याचे आव्हान

नाशिक5 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

डिप्लोमा करून अभियांत्रिकीच्या थेट दुसऱ्या वर्षाला प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांना यंदा पहिल्या सत्राचा अभ्यास करण्यासाठी केवळ एक महिन्याचा वेळ मिळणार आहे. २ डिसेंबरपासून परीक्षांना सुरुवात होणार असून, अभियांत्रिकीची प्रवेशप्रक्रिया अजून सुरू असून दोन फेऱ्या होणार असल्याने या फेऱ्यांचे प्रवेश कधी होणार अन् हे विद्यार्थी अभ्यास केव्हा करणार? हे असा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. त्यामुळे अभियांत्रिकीच्या थेट द्वितीय वर्षाला महिनाभरात परीक्षा देण्याचे आव्हान आहे.

तंत्रशिक्षण संचालनालयाकडून प्रवेशप्रक्रियेस होत असलेल्या उशिरामुळे ही अडचण निर्माण झाल्याने डीटीईने १५ दिवस विलंबाने परीक्षा घ्यावी, अशी मागणी महाविद्यालयांनी केली आहे. सध्या अभियांत्रिकीची प्रवेशप्रक्रिया सुरू आहे. दुसऱ्या फेरीचे अलॉटमेंट झाले आहे. यानंतर आणखी दोन फेऱ्या होणार आहेत. सुमारे २० दिवसांत ही प्रवेशप्रकिया पूर्ण होईल. लागलीच २ डिसेंबरपासून परीक्षांना सुरुवात होणार आहे. प्रथम वर्षाच्या विद्यार्थ्यांना परीक्षेसाठी पुरेसा अवधी देण्यात येईल. परंतु, थेट दुसऱ्या वर्षाला प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांना नियमित बॅचसोबतच परीक्षा द्यावी लागेल. यामुळे त्यांना अभ्यासक्रमास पुरेसा वेळ मिळणार नाही. थेअरी व प्रात्यक्षिके असा दुहेरी अभ्यास त्यांना महिनाभरातच पूर्ण करावा लागेल.

बातम्या आणखी आहेत...