आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

थंडीचा कडाका वाढला:थंडीने शहर गारठले ; किमान तापमानाचा पारा घसरला

नाशिक8 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

गेल्या चार दिवसांपासून उत्तर महाराष्ट्रात थंडीचा कडाका वाढला आहे. नाशिकमध्येही किमान तापमानाचा पारा घसरला आहे. साेमवारी (दि. २१) शहरातील ९.२ अंश सेल्सिअस तापमान नाेंदविण्यात आले. सकाळच्या वेळेत हवेत प्रचंड गारवा वाढल्याने माॅर्निंग वाॅकला जाणाऱ्यांची संख्या राेडावली आहेत. तर दुसरीकडे हुडहुडी भरणाऱ्या या थंडीमुळे सकाळ सत्रातील विद्यार्थ्यांची गैरसाेय हाेत आहे. तर अनेक शाळांमधील विद्यार्थी संख्याही राेडावली आहे. हिवाळ्यातील नोव्हेंबर महिन्यात थंडीचे दुसरे आवर्तन असून डिसेंबर, जानेवारी आणि फेब्रुवारी महिने बाकी असल्याने नागरिकांना यंदा दीर्घकाळ थंडीचा सामना करावा लागणार आहे. भविष्यात अशीच थंडी राहिली तर नाशिकच्या द्राक्षांवर विविध रोगांचे संकट राहणार आहे.

बातम्या आणखी आहेत...