आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करासिंहस्थ कुंभमेळ्यासह गाेदावरी नदीच्या दाेन्ही किनाऱ्यावर लाभलेले धार्मिक अधिष्ठान, वर्षभरात देशातील नव्हे तर जगभरातून भाविकांची हाेणारी गर्दी तसेच अलिकडेच वाइन कॅपिटल अशी नवीन आेळख झालेल्या शहरावर लक्ष ठेवण्यासाठी सीसीटीव्ही कॅमेऱ्यांबराेबरच चार ड्राेनही दिले जाणार आहे. नाशिक म्युनिसिपल स्मार्ट सिटी डेव्हलपमेंट काॅर्पोरेशन लिमिटेड कंपनीतर्फे महापालिका आणि पोलिस खात्याला प्रत्येकी दोन ड्रोन कॅमेरे देण्यात येणार आहेत. सध्या आधुनिक सुरक्षिततेचे उपाययाेजना म्हणून सीसीटीव्ही कॅमेरे व ड्राेनकडे बघितले जाते.
स्मार्ट सीटी कंपनीमार्फत जवळपास आठशे कॅमेरे बसवण्याचे काम सुरू आहे. दरम्यान, आता स्मार्ट सिटी मिशन अंतर्गत केंद्र शासनाच्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार नाशिक म्युनिसिपल स्मार्ट सिटी डेव्हलपमेंट कार्पाेरेशन लिमिटेड कंपनीद्वारे इम्प्लिमेंटेशन अॅँड मेन्टेनन्स आॅफ इंटिग्रेटेड सर्व्हेलन्स अॅँड सिटी आॅपरेशन्स प्लॅटफॉर्म फॉर इमर्जन्सी आॅपरेशन सेंटर या प्रकल्पांतर्गत ड्रोन कॅमेऱ्यांच्या माध्यमातून शहरावर नियंत्रण ठेवण्याचा प्रयत्न आहे. ड्रोनच्या माध्यमातून पूर परिस्थितीचे निरीक्षण, आगामी सिंहस्थ कुंभमेळ्यातील गर्दीचे नियंत्रण, विविध ठिकाणांचे अचूक मॅपिंग तसेच आपत्कालीन परिस्थितीवर नियंत्रण ठेवण्यास मदत होणार आहे. यासोबतच या प्रकल्पांतर्गत नाशिक शहरात २०० सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात येणार असून महापालिका मुख्यालय राजीव गांधी भवन, तसेच सहाही विभागीय कार्यालयांमध्ये आपत्ती व्यवस्थापन केंद्र उभारण्यात येणार आहे.
ड्रोनचा कशापध्दतीने वापर करावा, त्यासाठी कोणते सॉफ्टवेअर वापरले पाहिजे, ड्रोन वापरताना कोणती काळजी घेतली पाहिजे याची माहिती प्रशिक्षण घेणाऱ्या मनपा व पाेलीस कर्मचाऱ्यांना दिली. सर्व प्रशिक्षणार्थींची परीक्षा घेऊन त्यांना ड्रोन वापरण्याचा परवाना देण्यात आला. यावेळी महापालिका आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार, पोलिस आयुक्त अंकुश शिंदे, स्मार्ट कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुमंत मोरे, आयटी विभागाचे महाव्यवस्थापक अनिल तडकोड, उपमहाव्यवस्थापक सुधीर गोराडे तसेच ड्रोन कॅमेऱ्यांचे प्रशिक्षणार्थी उपस्थित होते.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.