आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Local
  • Maharashtra
  • Nashik
  • The Color Of Yeola's Paithani Cluster Did Not Open; No Funds Received From The Center: Only Erection For 12 Years, But The Work Is Incomplete | Marathi News

निधी:येवल्याच्या पैठणी क्लस्टरचा रंग खुलेना ; केंद्राचा निधी मिळेना : १२ वर्षांपासून केवळ उभारणी, तरी काम अपूर्णच

नाशिक2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

येवल्यातील पैठणी व्यवसायाला बुस्ट मिळावा, पारंपरिक हातमाग, रंग, धागा, कलर डाइंग, फासनेस, जॅकाट अशा पैठणी विणण्याच्या साधनांमध्ये तसेच पैठणीवर संशोधन आणि उत्पादने विकसित करून हा व्यवसाय नेण्यासाठी २०१०-११ मध्ये पैठणी क्लस्टर उभारण्याची तयारी सुरू झाली. आज बारा वर्षांनंतरही हे काम अपूर्णच आहे. विशेष म्हणजे शेजारीच कोपरगाव आणि संगमनेरला गारमेंट क्लस्टरचे यानंतरचे असूनही ते कार्यरतही झाले आहेत.सन २०१०-११ मध्ये येवला पैठणी क्लस्टरची मुहूर्तमेढ रोवली गेली, याकरिता केंद्र सरकारच्या योजनेतून निधी मिळणार होता. ६० कोटी रुपयांच्या या प्रकल्पासाठी पहिल्या टप्प्यात १३ कोटी रुपये मंजूर झाले, त्यापैकी ७ कोटी रुपयांतून क्लस्टरच्या इमारतीचे काम पूर्ण करण्यात आले मात्र, तांत्रिक अडचणीत हा प्रकल्प अडकल्याने केंद्र सरकारकडून येणारा निधी आला नाही. त्यामुळे येथे यंत्रसामग्री अद्यापही येऊ शकलेली नाही. सात कोटी रुपये खर्चून उभारलेल्या इमारती कुलूपबंद अवस्थेत आहेत. त्यामुळे येवला शहर व परिसरातील शेकडो विणकरांचे जीवन बदलून टाकण्याची क्षमता असलेल्या व क्लस्टरच्या माध्यमातून मिळणे अपेक्षित असलेल्या एकत्रित सुविधा येथे अद्यापही उभ्या राहू शकलेल्या नाहीत.

बातम्या आणखी आहेत...