आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नियुक्ती:फेेरीवाले मतदानाद्वारे निवडणार समिती; पालिकेची पथविक्रेता समितीसाठी प्रक्रिया सुरू

नाशिक5 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

राज्य शासनाच्या आदेशानुसार फेरीवाला समिती रद्द करून नव्याने २० सदस्यीय पथविक्रेता समिती स्थापन करण्याची प्रक्रिया महापालिकेने सुरू केली आहे. पथविक्रेत्या समितीमध्ये नोंदणीकृत फेरीवाल्यांमधून आठ सदस्यांची निवडणुकीद्वारे नियुक्ती केली जाणार आहे. त्यासाठी फेरीवाल्यांचे नोंदणी प्रमाणपत्र वाटपाची प्रक्रिया महापालिकेच्या सहाही विभागीय कार्यालयांमध्ये सुरू आहे. प्रमाणपत्र वाटपानंतर फेरीवाल्यांची मतदार यादी तयार केली जाणार असून ही यादी कामगार उपायुक्त कार्यालयाला सादर करून त्यातून आठ सदस्य नियुक्तीसाठी निवडणूक प्रक्रिया राबविली जाणार आहे.

समितीतील सहा अशासकीय सदस्य नियुक्तीसाठी २५ नोव्हेंबरपर्यंत अर्ज मागविण्यात आले आहे. महापालिकेने २०१३ मध्ये शासन निर्णयानुसार ३० सदस्यीय फेरीवाला समितीची स्थापना केली होती. या समितीद्वारे फेरीवाल्यांचे बायोमेट्रिक सर्वेक्षण करून फेरीवाला क्षेत्रांची निश्चिती करण्यात आली होती.

पथविक्रेता समितीत यांचा समावेश
पथविक्रेता समितीत आयुक्त हे पदसिद्ध अध्यक्ष असतील. पोलिस आयुक्त, विशेष नियोजन प्राधिकरणाचे कार्यकारी प्रमुख, पोलिस सहआयुक्त(वाहतूक), आरोग्याधिकारी आणि अग्रणी बॅँकेचा एक प्रतिनिधी अशा प्रकारे सहा अधिकारी या समितीचे पदसिद्ध सदस्य आहेत. निवडणुकीद्वारे फेरीवाल्यांमधून आठ सदस्यांची निवड केली जाईल. अशासकीय संघटना-समुदाय आधारित संघटना, निवासी कल्याण संघ, व्यापारी संघ, पणनसंघ यातून सहा अशासकीय सदस्यांची नियुक्ती केली जाईल.

बातम्या आणखी आहेत...