आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

व्हीआयपींची साेय:सर्वसामान्यांचा प्रवास खड्डेमय; डांबर ओतून व्हीआयपींची साेय

नाशिकएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

शहरात गेल्या चार दिवसांत राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसेच राज्यपाल भगतसिंग काेश्यारी यांच्यासह केंद्रीय राज्यमंत्री तसेच विविध व्हीआयपींच्या दाैरे मार्गांवर पालिकेने तातडीने खड्डे बुजवत रस्ते चकाचक केले. मात्र, सामान्य नागरिकांची वाट ही खडतर रस्त्यावरूनच सुरू असल्याचे चित्र शहरात बघावयास मिळत आहे. एकीकडे गणेशोत्सवासाठी पालिकेकडून शहरातील ९ हजार खड्डे थेट डांबराने बुजवल्य‍ाचा दावा आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार यांच्याकडून करण्यात आला असला तरी प्रत्यक्ष:त शहरातील सर्वच प्रमुख रस्ते खड्डेमय झाल्याचे दिसून येत असल्याने यंत्रणेचा हा दावा फाेल ठरत आहे.

गणेशोत्सवामुळे काही रस्त्यांसह मिरवणूक मार्गावरील खड्डे बुजवण्याचे काम पालिकेने हाती घेतले आहे. त्यातच ९ हजार खड्डे खडी, डांबराचा वापर करून बुजवल्याचा दावाच करण्यात आला आहे. ज्या ठिकाणी खड्डे बुजवले तेच रस्ते गुरुवारी झालेल्या पावसामुळे पुन्हा उखडल्याने या कामाच्या गुणवत्तेवर प्रश्न उपस्थित हाेत आहे. मात्र, अतिमहत्त्वाच्या व्यक्तींच्या दाैऱ्यासाठी मनपा प्रशासनाने तातडीने का हाेईना द्वारका चाैक, गडकरी चाैक, मायकाे सर्कल,

नाशिककरांना त्रस्त करणारे सहा विभागांतील खड्ड्यांचे ‘ब्लॅकस्पॉट’ असे
पूर्व विभाग : टाकळीरोड, वडाळारोड, पाथर्डी फाटा, एक्सप्रेस इन हाॅटेल ते नरहरीनगर, पांडवलेणीपर्यंतचा रस्ता, तपोवनरोड, वडाळा-पाथर्डीरोड, सारडा सर्कल, नाशिक-पुणेरोड, राजीवनगररोड, भाभानगर.
पश्चिम विभाग : मेनरोड, राका लाॅन्स, तिडके काॅलनी, मायकाे सर्कल ते चांडक सर्कल, दुर्वांकुर लॉन्स ते आरडी सर्कल.

विभाग : मायकाे सर्कल ते सिटी सेंटर मॉल चौक, उंटवाडीरोड, निमा हाउससमोर, पीएफ कार्यालयासमोर, आयटीआयसमोर, मीनाताई ठाकरे शाळेसमोर, मायको सर्कल, बडदेनगर ते कर्मवीरनगर.
नाशिकरोड विभाग : वीर सावरकर उड्डाणपुलाखाली, गोसावीवाडी, रेल्वे स्टेशन परिसरासमोर, विहितगाव, देवळालीगाव.

महापालिकेकडून एक खड्डा बुजविण्यासाठी जवळपास ४५ हजार रुपये खर्च केला जातो. पालिका आयुक्तांकडून ९ हजार खड्डे बुजवण्यात आल्याचा दावा करण्यात आला आहे. याचा विचार करता आपत्कालीन निधी म्हणून तरतूद करण्यात आलेला २७ कोटी रुपयांचा निधी रस्त्यांवरच खर्च करण्यात आल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे.

एकीकडे चकाचक, दुसरीकडे खड्डेमय रस्ते
मंत्री, राजकीय नेते अशा व्हीआयपींच्या दाैरा मार्गावरील शहरातील रस्ते असे चकाचक करण्यात येतात, मात्र सर्वसामान्य नागरिकांना राेजच खड्डेमय रस्त्यांवरून ये-जा करावी लागते. या दाेन्ही रस्त्यांची ही प्रातिनिधिक छायाचित्रे...

बातम्या आणखी आहेत...