आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

9 वर्षांपासून फरार आरोपी अटकेत:मजुरीचे पैसे न दिल्याने ठेकेदाराचा केला होता खून, घटनेच्या दिवसापासून होता फरार

नाशिक7 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

खुनप्रकरणी ९ वर्षांपासून फरार असलेल्या संशयिताला अटक करण्यात आली. गुन्हे शाखा युनिट २ च्या पथकाने मुंबई येथे ही कारवाई केली. मंगरु उर्फ अब्दुल मन्नान चौधरी असे या फरार संशयिताचे नाव आहे. ४ मार्च २०१३ रोजी मेहबुब नगर वडाळागाव येथे पीओपी ठेकेदार अब्दुल सलाम मुस्तफा चौधरी याचा गळा आवळून त्याने खुन केला होता.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, २०१३ मध्ये इंदिरा नगर पोलिस ठाण्यात रुबीना शेख यांनी तक्रार दिली होती. त्यानुसार, त्यांचे पती अब्दुल चौधरी हे पीओपी कामाचे ठेकेदार होते. त्यांच्याकडे एक अल्पवयीन मुलगा, अल्लारक्षा मसल्ली शहा फकिर, मंगरु उर्फ अब्दुल चौधरी (रा. उत्तर प्रदेश) हे कामाला होते. मयत चौधरी हे या संशयितांकडून जादा काम करुन घेत होते. सशंयित मंगुर यास मुलगी बघण्यासाठी मुळगावी जायचे असल्याने मजुरीचे पैसे आणि सुट्टी मागितली. मयत चौधरी यांनी पैसे आणि सुट्टी दिली नाही म्हणून संतापात चौधरी यांचा गळा आवळून खुन केला. पोलिसांनी संशयित अल्लारक्षा शहा आणि एका अल्पवयीनास ताब्यात घेतले होते. संशयित मंगरु फरार होता. पथकाचे चंद्रकांत गवळी यांना माहिती मिळाली संशयित मुंबई येथे आला आहे. पथकाने त्याचा माग काढत अटक केली. वरिष्ठ निरिक्षक आनंद वाघ, पोपट कारवाळ, नंदु नांदुर्डीकर, राहुल पालखेडे, यांच्या पथकाने ही कारवाई केली.

अशी केली कारवाई

फरार झालेला संशयिताच्या संपर्कात असलेल्या व्यक्तीचा पथकाने माग काढला. त्यातून एक कामगाराचे नाव समजले. त्याची चौकशी केली असता तो उत्तर परदेशातून मुंबई येथे काम करत असल्याचे समजले. पथकाने त्याचा तंत्र विश्लेषण शाखेच्या मदतीने माग काढला.

बातम्या आणखी आहेत...