आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शहरातील नवे व जुने रस्ते उखडले:ठेकेदार जाणार काळ्या यादीच्या खड्ड्यांत; महापालिका आयुक्तांचे गुणवत्ता विभागाला आदेश

नाशिक3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

गेल्या तीन वर्षांत ४५० काेटींपेक्षा अधिक रकमेचे रस्ते झाले असून त्यावर माेठे खड्डे पडल्यामुळे शनिवारी (दि. २०) आयुक्त डॉ. चंद्रकात पुलकुंडवार यांनी खातेप्रमुखांच्या बैठकीत बांधकाम आणि गुणवत्ता नियंत्रण विभागाला धारेवर धरले. निकृष्ट दर्जाचे काम करणाऱ्या ठेकेदारांना काळ्या यादीत टाकण्याचे आदेशही त्यांनी यावेळी दिले.

गेल्या पाच वर्षांत सहाशे काेटींपेक्षा अधिक रक्कम रस्त्यांवर खर्च झाली. मात्र, पावसामुळे शहरातील नवे व जुने रस्ते उखडले आहेत. त्यामुळे गुणवत्ता नियंत्रण विभागावर प्रश्नचिन्ह निर्माण झाल्याने आयुक्त पुलकुंडवार यांनी बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांना धारेवर धरले, नागरिक कर भरून जर त्यांच्या पदरी खड्डे, अपघात पडणार असेल तर आपला काय उपयाेग,असेही त्यांनी सुनावले. दरम्यान, रस्त्यांची कामे मिळवण्यासाठी सर्वपक्षीय लाेकप्रतिनिधींची झालेली युती गेल्या दाेन वर्षांत चर्चेत राहिली. त्यावेळी मर्जीतील ठेकेदाराला कामे देण्यासाठी दबाव टाकणारे पदाधिकारीच आता खड्डे बुजवण्यासाठी कांगावा करीत असल्यामुळे अधिकारी हतबल झाल्याचे चित्र आहे.

मिरवणूक मार्ग खुले करा
खड्डे बुजवा,गणेश मिरवणुकीचे मार्ग खुले करा, नोटिसा देऊनही काम न करणाऱ्या आणि निकृष्ट दर्जाचे रस्ते तयार करणाऱ्या ठेकेदारांना काळ्या यादीत टाका असे निर्देश आयुक्तांनी यावेळी दोन्ही विभागांना दिलेत.

बातम्या आणखी आहेत...