आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

विद्युत वरुन राजकीय आखाडा:भ्रष्टाचारांच्या मुठीत देशातील ‘पॉवर’ सेक्टर : मुरलीकृष्णन

नाशिक2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

‘केंद्र आणि राज्य सरकारने विद्युत क्षेत्राला आपला राजकीय आखाडा बनवले आहे. सरकारच्या या ‘हाइड अँड सिक’ च्या खेळात मात्र कामगारांना फटका बसत आहे. केंद्र सरकार सातत्याने वीज वितरण व्यवस्था उभारण्यासाठी कर्ज मंजुरी देत आहे. परंतु आपली व्होट बँक टिकवून ठेवण्यासाठी काही राजकारणी केंद्राच्या या योजनांना हरताळ फासण्याचा प्रयत्न करीत आहेत. वितरण व्यवस्थेच्या अपयशाला भ्रष्ट राजकारणीच जबाबदार असून सध्याचे ‘पॉवर’ सेक्टर राजकारण्यांच्या मुठीत फसले असल्याचे मत अखिल भारतीय विद्युत मजदूर महासंघाचे अध्यक्ष आर. मुरलीकृष्णन यांनी व्यक्त केले.

नाशिक येथील देवधर अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या प्रांगणात आयोजित केलेल्या दोनदिवसीय अधिवेशनात मुरलीकृष्णन बोलत होते. ‘देशाची सेवा करणे हाच विचार समोर ठेवून महासंघाची वाटचाल सुरू आहे. आपला मजदूर संघ कुठल्याही राजकीय विचारसरणीशी प्रेरित नाही, असे प्रतिपादन अखिल भारतीय विद्युत मजदूर महासंघाचे संस्थापक सदस्य व माजी अध्यक्ष के. के. हरदास यांनी केले.

बातम्या आणखी आहेत...