आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करातंबाखूचे सेवन करण्यामुळे वैयक्तिक स्वरूपाची हानी तर होतेच. परंतु देशाच्या सामाजिक आरोग्यावरही त्याचे विपरित परिणाम होतात. वैद्यकीय व्यवस्थेचे अर्थकारणही त्यामुळे प्रभावित होत असते. या गंभीर समस्येकडे लक्ष वेधत अपर जिल्हाधिकारी दत्तप्रसाद नडे यांनी तंबाखूचे सेवनापासून दूर राहण्याचा सल्ला दिला. जिल्हा सामान्य रुग्णालयात तंबाखू विरोधी दिनानिमित्ताने आयोजित कार्यक्रमात लोकाभिमुख स्वरूपाच्या जनजागृतीची गरज त्यांनी व्यक्त केली.
तंबाखूजन्य पदार्थांमुळे मानवी आरोग्यावर होणाऱ्या तीव्र व गंभीर स्वरूपाच्या परिणामांमुळे त्याचा प्रसार रोखणे आवश्यक आहे. तसेच तंबाखू विरोधी कोटपा कायद्याची प्रभावी व कठोर अंमलबजावणी करावी लागेल.
पदव्युत्तर महाविद्यालयाचे अधिष्ठाता मेजर जनरल डॉ. एस. के. झा म्हणाले की, तंबाखू आणि तंबाखूजन्य पदार्थामुळे पर्यावरणाला प्रचंड हानी होत असून आरोग्यासोबतच प्रदूषणासारखी गंभीर समस्या निर्माण झाली आहे. तंबाखू आणि तंबाखूजन्य पदार्थाच्या सेवन व सिगारेटचे सेवन करणाऱ्यास आणि सेकंड हॅण्ड स्मोक म्हणुन इतरांनाही समस्या निर्माण होतात, प्रदूषण वाढते. तरुणांनी या तंबाखू विरोधी मोहिमेत सक्रीय सहभागी होण्याचे आवाहन त्यांनी केले. एचसीजी मानवता सेंटरचे वरिष्ठ कर्करोग चिकित्सक डॉ. राज नगरकर यांनी मार्गदर्शन केले.
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. अशोक थोरात, जिल्हा शल्य चिकित्सक यांनी तर सुत्रसंचालन वैद्यकिय अधिकारी, आयुष विभाग डॉ. निलेश पाटील यांनी केले. जिल्हा कार्यक्रम व्यवस्थापक डॉ. राहुल हाडपे, यांनी आभार मानले. आरोग्य उपसंचालक डॉ. रघुनाथ भोये उपस्थित होते.
प्रदर्शन आणि रॅलीतून जनजागृती
तंबाखू विरोधी जनजागृती प्रदर्शनाचे उद्घाटन, रांगोळी स्पर्धांचे आयोजन, पथनाटय तसेच जनजागृती रॅली सादरीकरणात शासकिय परिचारिका महाविद्यालयाच्या विद्यार्थीनी, नवजीवन विधी महाविद्यालयाच्या एनएसएसच्या विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.