आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिव्य मराठी विशेष:इ-बायसिकलची क्रेझ; तीन तास चार्जिंग, 30 कि. मी. अंतर, एका चार्जिंगसाठी लागते एक युनिटपेक्षाही कमी वीज, सुट्यांमुळे मागणी वाढली

नाशिक2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

नाशिकची ओळख सायकल कॅपिटल अशी होऊ लागली आहेच. विद्यार्थीही सायकलकडे मोठ्या संख्येने आकर्षित झाले आहेत. त्यांच्याकडून नव्याने बाजारात दाखल झालेल्या इलेक्ट्रिक सायकलची मागणी वाढली आहे.

त्याला इ-बायसिकल असेही म्हटले जाते. अगदी तीस हजारांपासून सुरू होत असलेली ही सायकल अडीच ते तीन तासांच्या चार्जिंगमध्ये २५ ते ३० किलोमीटरचे अंतर सहज पार करते. पर्यावरणपूरक आणि एका चार्जिंगकरिता एक युनिटपेक्षाही कमी लागणारी वीज यामुळे या सायकल मुलांना खरेदी करून देण्यासाठी पालकही पुढे येत असल्याचे चित्र शहरात आहे.

सायकलिंगमुळे मानसिक आणि शारीरिक आरोग्य सुधारण्यास मदत होते. त्यामुळे नाशिकमध्ये सायकलिस्टची चळवळ रुजत आहे. सायकल बाजार जोरात असतानाच त्यात आता, इलेक्ट्रिक सायकलने भर घातली आहे. देशात सध्या इलेक्ट्रिक वाहनांची क्रांती पहायला मिळत असतांनाही विद्यार्थी वर्गही याकडे वळत असल्याने प्रदूषणमुक्त नाशिककडे वाटचाल असल्याचे समाधान व्यक्त होत आहे.

बातम्या आणखी आहेत...