आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करास्वरांतून निथळणाऱ्या भक्तिपूर्ण जाणिवांची सकाळ आणि त्या शब्दांतून मनाची प्रसन्नता सांगणारं प्रयोगशील स्वरांचं सामर्थ्य घेऊन आलेला गायक ओंकार कडवेचा उमलणारा आवाज रसिकांना अनुभूतीच्या एका वेगळ्या वळणावर घेऊन केला. नव्या पिढीतील कलाकारांच्या आविष्काराला हक्काचे व्यासपीठ देण्यासाठी विश्वास हब सावरकरनगर येथे ‘सूर विश्वास’ या मैफलीचे आयोजन करण्यात आले होते. ओंकार कडवे यांनी सूर विश्वासाचे पंधरावे पुष्प गुंफले.
त्यांना अद्वय पवार (तबला), संस्कार जानोरकर (संवादिनी), यशवंत केळकर (तानपुरा) आणि आर्या गायकवाड (तानपुरा) यांनी साथसंगत केली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. स्मिता मालपुरे यांनी केले. ओंकारने मैफलीची सुरुवात अहिर भैरव रागातील बडा ख्यालाने केली. शब्द होते ‘रसिया म्हारा अमला राता माता आजोजी’ रसपूर्ण जगण्याचे सार आणि आशय घेऊन मानवी संवेदनांचे अलवार भावचित्र समोर आले. ‘अलबेला साजन आयो रे’ यातून प्रेमानुभूती आणि मनाचं निराकारत्व यांची अनोखी सांगड घातली. ‘ओंकार महाराज तिरथ जाऊंगा’या भजनातून आपल्यातील तरल जाणिवांचे चित्र समोर आले. मैफलीचा शेवट ‘प्रभुजी तूम चंदन हम पानी’ या भैरवीने केला.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.