आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शैक्षणिक:इंजिनिअरिंगसाठी ऑनलाइन प्रवेश अर्जाची मुदत येत्या 18 नोव्हेंबरपर्यंत

नाशिकएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

एमएचटी सीईटी परीक्षांचे निकाल जाहीर झाल्यानंतर अखेर इंजिनिअरिंग प्रवेशाची प्रक्रिया सुरू झाली आहे. अभियांत्रिकी पदवी (बीई) प्रवेशाचे संभाव्य वेळापत्रक जाहीर झाले. सीईटी दिलेल्यांना प्रक्रियेत सहभागी होण्यासाठी नोंदणीची मुदत १८ नोव्हेंबरपर्यंत असेल. २८ पासून प्रत्यक्ष कॅप राउंडच्या प्रक्रियेस सुरुवात होईल. शैक्षणिक वर्ष २०२१-२२ साठी ही प्रवेशप्रक्रिया राबवली जात आहे. सीईटीचा निकाल जाहीर झाल्यानंतर विद्यार्थ्यांना पुढील प्रक्रियेची प्रतीक्षा होती. नुकतेच सीईटी सेलने वेळापत्रक प्रसिद्ध केले असून त्यानुसार सीईटी दिलेल्यांना ऑनलाइन नोंदणी व आवश्यक कागदपत्रे अपलोड करण्यास १८ नोव्हेंबरच्या सायंकाळी ५ पर्यंत मुदत असेल. २७ राेजी अंतिम गुणवत्ता यादी जाहीर होऊन नंतर कॅप राउंड सुरू होईल. कागदपत्रे अपलोडनंतर ई-स्क्रूटिनी व सुविधा केंद्रावर जाऊन कागदपत्रांच्या पडताळणीसाठी स्क्रूटिनीची सुविधा उपलब्ध असेल.

प्रवेशाचे वेळापत्रक
- ऑनलाइन अर्ज व कागदपत्र अपलोड : १८ नोव्हेंबरपर्यंत
- कागदपत्रे पडताळणी प्रक्रिया : २० नोव्हेंबरपर्यंत
- प्रारूप गुणवत्ता यादीची प्रसिद्धी : २२ नोव्हेंबर
- यादीशी निगडित तक्रार, हरकती नोंदवणे : २३ ते २५ नोव्हें.
- अंतिम गुणवत्ता यादी : २७ नोव्हेंबर
- पहिल्या कॅप राउंडसाठी नोंदणीची प्रक्रिया : २८ ते ३० नोव्हेंबर
- पहिली वाटप यादी : २ डिसेंबर
- प्रवेश निश्चितीची मुदत : ३ ते ५ डिसेंबर

६ डिसेंबरपासून कॉलेज सुरू
सीईटी सेलच्या वेळापत्रकानुसार प्रवेशप्रक्रिया २३ डिसेंबरपर्यंत चालणार आहे. तत्पूर्वी ६ डिसेंबरपासून महाविद्यालयांतर्फे अध्ययन प्रक्रिया सुरू केली जाऊ शकते. नंतर प्रवेशित विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होणार नाही याची खबरदारी घेण्याच्या सूचना दिल्या आहेत.

बातम्या आणखी आहेत...