आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Local
  • Maharashtra
  • Nashik
  • The Death Of A Girl Injured In An Accident With Her Parents During Treatment Casts A Pall Over The Chavan Family Of CIDCO. Three Died Including The Car Driver, Two Are In Critical Condition

आई वडिलांसह अपघातात जखमी मुलीचा उपचारावेळी मृत्यू:सिडकोतील चव्हाण कुटुंबीयांवर काळाचा घाला, दोघांची प्रकृती गंभीर

नाशिक13 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

सिडकोतील उत्तम नगर येथील रहिवासी असलेले चव्हाण कुटुंबीय शिरपूर येथे कानबाईच्या दर्शन घेवून नाशिककडे परतत असताना धुळ्याजवळ नरडाणा येथे ट्रॅक्टर व कारच्या अपघातात कारचालकासह चव्हाण दांपत्यांचा मृत्यू झाला असून याच अपघातत जखमी झालेल्या चार वर्षीय बालिकेचाही उपचारावेळी निधन झाले. चव्हाण दांम्पत्यासह बालिकेवर सिडकाेतील माेरवाडी स्मशान भूमीत शाेकाकूल वातावरणात अंत्यंस्कार करण्यात आले.

धुळे जिल्ह्यतील साक्री येथील मूळ रहिवासी व सध्या उत्तमनगर येथे राहणारे संदीप शिवाजी चव्हाण (40 वर्ष) व त्यांच्या पत्नी मीना चव्हाण हे तीन मुलांसह भाड्याची कार करून देव दर्शनासाठी गेले होते. पुन्हा नाशिकला परतत असताना साेमवारी (दि.१)रात्री उशिरा यांच्या त्यांच्या कारचा व ट्रॅक्टर चा भीषण अपघात झाला. अपघात इतका भयानक होता की कारचा चेंदामेंदा झाला. यात संदिप व मीना चव्हाण यांचा जागीच मृत्यू झाला. तर कारचे चालक हितेश अरुण चौधरी (रा.म्हसरूळ) याचाही जागीच मृत्यू झाला. तर चव्हाण यांची ४ वर्षांची लहान मुलगी जान्हवी (परी) हीचाही उपचारादरम्यान मंगळवारी पहाटेच्या सुमारास तिची प्राणज्याेत मालवली. मुलगा गणेश (६ वर्ष) व मुलगी साक्षी (१० वर्ष) हे ही जखमी असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. या अपघात एकूण चौघांचा मृत्यू झाल्याने हळहळ व्यक्त होत आहे. संदीप चव्हाण हे स्वतः ही कार चालक होते. त्यांच्या पच्यात आई व एक बहीण तसेच एक मुलगा व एक मुलगी असा परिवार आहे. सायंकाळी मोरवाडी स्मशानभूमीत अतिशय भावपुर्ण वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. संदपी यांचा मनमिळावू स्वभाय असल्यने व माेठा मित्र परिवार हाेता. त्यांच्य अपघाती निधनाने सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात हाेती.

रात्री उशिरा अंत्यसंस्कार

चव्हाण कुटुंबातील एकाच वेळी आई वडील व मुलीचा असा तींघांचा मृत्यू झाल्याने व तिघांचे एकाचवेळी मंगळवारी रात्री अंत्यसंस्कार झाल्याने हळहळ व्यक्त होत आहे. चव्हाण कुटूंबियातील नातलगांनी एकच हंबरठा फाेडल्याने सर्वांनाच अश्रू अनावर झाले हाेते.

बातम्या आणखी आहेत...