आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

निर्णय‎:उद्या 87 विषयांच्या‎ फेरपरीक्षेचा निर्णय‎

नाशिक‎2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

पदवी आणि पदव्युत्तरच्या १०‎ अभ्यासक्रमांच्या ८७ विषयांची शुक्रवारी‎ (दि. ३) रद्द झालेल्या फेरपरीक्षेबाबत‎ अद्यापही विद्यापीठाने पुढील तारीख जाहीर‎ केली नाही. त्याबाबत शुक्रवारी (दि. ३)‎ मॅनेजमेंट काैन्सिलच्या बैठकीतही कुठलाही‎ निर्णय झाला नसून सोमवारी (दि. ६)‎ याबाबत निश्चिती होईल, असे‎ विद्यापीठाच्या वरिष्ठ अधिकाऱ्याकडून‎ सांगण्यात आले.‎ राज्यातील अकृषी विद्यापीठे आणि‎ अशासकीय महाविद्यालयांतील शिक्षकेतर‎ कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामुळे पुणे‎ विद्यापीठाच्या परीक्षा स्थगित झाल्या आहेत.‎

कर्मचारीच नसल्याने परीक्षे घेणार तरी‎ कशा? यामुळे आता विद्यापीठाद्वारे या‎ कर्मचाऱ्यांची समजूत काढण्याचे काम सुरु‎ आहे. दूसऱ्या बाजूने शासनासोबतही चर्चा‎ सुरु आहे. पण या स्थितीत विद्यार्थ्यांना मात्र‎ नस्ताप सहन करावा लागत आहे. ३‎ फेब्रुवारीच्या परीक्षांचे फेरनियाेजन करण्यात‎ येत असल्याचे परीक्षा व मूल्यमापन‎ मंडळाच्या संचालकाकडून नाशिक,‎ अहमदनगर आणि पुणे जिल्ह्यातील सर्व‎ संलग्न महाविद्यालये, संस्था आणि‎ प्राचार्यांना सूचना देण्यात आल्या आहेत.‎ पण त्याची तारीख जाहीर झालेली नाही.‎

शनिवारचे पेपर‎ यापूर्वीच पुढे‎
शनिवारी (दि.४ फेब्रुवारी)‎ होणारे पुणे विद्यापीठाच्या ५६‎ विषयांची लेखी परीक्षा‎ यापूर्वीच विद्यापीठाने पुढे‎ ढकलली आहे. त्यात बी.एस्सी,‎ बी.एस्सी काॅम्प्युटर, बीए. बी.‎ काॅम, एम.ए., एम.एस्सी या‎ अभ्यासक्रमांचा समावेश आहे.‎ यातील काही पेपर ६‎ फेब्रुवारीला करण्याचे नियोजित‎ आहे. तर काही पेपरची परीक्षा‎ फेब्रुवारीच्या शेवटच्या‎ आठवड्यात होईल, असे‎ विद्यापीठाने सांगितले.‎

आजच्या पेपरला‎ कर्मचारी नियुक्त‎
पदवीधर निवडणुकीमुळे ३०‎ जानेवारीची परीक्षा रद्द करून‎ रविवारी (दि. ५) ठेवण्यात‎ आली. त्याच कर्मचाऱ्यांनी‎ आंदोलन सुरू केल्याने‎ नियोजित पेपर नाॅन ग्रॅन्ट‎ कर्मचाऱ्यांच्या मदतीने घेणार‎ घेण्याचे ठरले आाहे.‎

बातम्या आणखी आहेत...