आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अनुकंपा तत्वावरील भरतीला तत्वत:मान्यता जिल्हा मुख्याध्यापक संघाची शिक्षण उपसंचालकांसोबत बैठकीत निर्णय

नाशिक25 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

अनुकंपा तत्वावरील भरतीला शिक्षणाधिकारी, शिक्षण उपसंचालक तत्वतः मान्यता देत असून अनुकंपा तत्वावरील एकही मान्यता प्रलंबित राहणार नाही याची काळजी घेतली जाणार असून उच्च न्यायालयाचे आदेश दिले असल्याचे शिक्षण उपसंचालकांनी सांगितले.

नाशिक जिल्हा मुख्याध्यापक संघ व शिक्षण उपसंचालक कार्यालय नाशिक, शिक्षणाधिकारी माध्यमिक,प्राथमिक,शिक्षण उपसंचालक कार्यालयात जिल्हा मुख्याध्यापक संघाची सकारात्मक चर्चा झाली.

शिक्षण उपसंचालक डॉ.बी.बी.चव्हाण, शिक्षणाधिकारी माध्य.डॉ.मच्छिद्र कदम, वेतन पथक अधिक्षक उदय देवरे (माध्य ),.सुधीर पगार अधिक्षक (माध्यमिक), गणेश फुलसुंदर ( प्राथ ) अधिक्षक शिक्षण उपसंचालक कार्यालयाचे लेखाधिकारी कदम यांच्या उपस्थित पार पडल. एकही प्रश्न प्रलंबित राहणार नाही व दप्तर दिरंगाई होणार नाही याची काळजी घ्यावी व सर्वच प्रश्न तातडीने मार्गी लावावे असे सांगितले.

मुख्याध्यापक,उपमुख्याधापक व पर्यवेक्षक यांच्या वैयक्तिक मान्यता त्वरित देण्यात याव्या अशी मागणी करण्यात आली.तुरळक प्रकरण वगळता तसेच सेवा जेष्टता यादीतील घोळ सोडता प्रलंबीत प्रकरणे कमी मुख्याध्यापक यांना तीन महिन्यापेक्षा जास्त वेळा सह्याचे अधिकार न देता कायमस्वरूपी मान्यता देण्यात याव्या.काही मुख्याध्यापक सहयाच्या अधिकारातच सेवानिवृत्त झाल्याचे शिक्षण उपसंचालकाच्या लक्षात आणून दिले.

फरक बीले व मेडीकल बीले प्रलंबीत आहे.पी.एफची लोन प्रकरणे बंद केलेली आहे.प्रकरणे ही ऑनलाईन चालू आहे.ऑफलाईन प्रकरणे बंद करण्यात आलेली आहे नॉन प्लॅन मधून काढावयाची आहे असे श्री उदय देवरे यांनी सांगितले. सेवानिवृत्ती लोकांचे रोखीकरण सेवा हमी कायद्यानुसार शिक्षणाधिकारी यांच्या हेड खाली काढता येतात त्यामुळे पेन्डेसी राहणार नाही प्रशासकीय मान्यता मिळून जाईल अशी विश्वासपूर्वक माहिती दिली.

20 टक्के अनुदानित कर्मचारी यांना शालार्थ देण्यात यावे काही कर्मचाऱ्यांना पूर्वी पासून मान्यता आहे पण शालार्थ नाही असा 15 तारखेपर्यत मेल करावयाचा आहे व किती जागा आहे याचे अपलोड करून डिक्लेअर करावयाचे आहे.

शिक्षकांचा सन्मान फोटो वर्गात लावण्यासाठी संघाने विरोध दर्शविला आहे, 1901 टी.एस.पी.या योजनेखाली येणाऱ्या शाळांचे व तुकड्यांचे पगार एक तारखेलाच झाले पाहिजे असा आग्रह धरला अशा अनेक प्रश्नांवर चर्चा करून सकारात्मक निर्णय उपसंचालकांनी मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष एस.के.सावंत,कार्याध्यक्ष एस.बी. शिरसाठ,सचिव एस.बी.देशमुख,उपाध्यक्ष प्रदीप सांगळे, बी.के.शेवाळे,पुरुषोत्तम रकिबे,विद्या सचिव भरत गांगुर्डे,सहसचिव अशोक कदम,शरद गीते,परवेझा शेख, डॉ.अनिल माळी होते.

बातम्या आणखी आहेत...