आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिव्य मराठी ग्राउंड रिपोर्ट:मेरीच्या इमारतींची भग्नावस्था  10 ते 12 वर्षांपासून अधिकारी निद्रिस्तच; निधीचे देतात कारण

नीलेश अमृतकर|नाशिक3 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

महाराष्ट्र अभियांत्रिकी संशाेधन संस्था अर्थात मेरीच्या दिंडाेरीराेडवरील सुमारे १४८ हेक्टरवरील कार्यालय आणि अधिकारी, कर्मचाऱ्यांसाठी उभारण्यात आलेल्या ६० इमारती, अधिकाऱ्यांच्या निवासस्थानांची भग्नावस्था झाली आहे. गेल्या १० ते १२ वर्षांपासून या इमारती आणि परिसर आेस पडला आहे. मात्र वेळीच याकडे लक्ष न दिल्याने आता हा परिसर आेसाड पडला आहे.

आता अधिकाऱ्यांना जाग येऊन यासंदर्भात मेरी विभागाने शासनाकडे पाठपुरावा करूनही देखभाल, दुरुस्तीसाठी अवघा ८० ते ९० लाखांचा निधी उपलब्ध हाेत असल्याने या तुटपुंज्या निधीमध्ये नेमकी काय दुरुस्ती करावी असा प्रश्न या विभागाच्या अधिकाऱ्यांना पडला आहे.

या इमारतींच्या अवस्थेचा हा ग्राउंड रिपाेर्ट...दिंडाेरीराेडवर धरणांसंदर्भातील तसेच जलसंपदा विभागाच्या विविध कामांबराेबरच संशाेधनाचे एकमेव कार्यालय नाशिक येथे मेरी हे आहे. गेल्या ५० वर्षांपेक्षा अधिक काळापासून मेरीचे कार्यालय असून या ठिकाणी जलसंपदा विभागात नियुक्त हाेणाऱ्या कनिष्ठ अभियंत्यांसह वरिष्ठ अधिकाऱ्यांना प्रशिक्षणही दिले.

निधी कमी पडताे
गेल्या दहा ते बारा वर्षांपासून या ठिकाणी काेणतेही कर्मचारी, अधिकारी रहात नसल्याने या इमारतींची दुरवस्था झाली आहे. मेरीच्या बांधकाम विभागाकडेच या इमारतींच्या देखभाल-दुरुस्तीची जबाबदारी आहे. मात्र वर्षाला ८० लाख ते १ काेटींचा निधी मिळताे.

१४८ हेक्टरसाठी ताे कमी पडताे. सद्यस्थितीत या आवारात पाेलिस ठाणे, शाळा, टपाल खाते, गुन्हा अन्वेषण विभाग, प्रयाेगशाळा अशा आठ ते दहा सरकारी कार्यालयांना जागा दिलेली आहे. - प्रशांत माेरे, कार्यकारी अभियंता, मेरी

बातम्या आणखी आहेत...