आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराबारावीच्या निकालात विभागात नाशिक जिल्ह्याचा निकाल ९२.६५ % लागला आहे. यात ९५.१८% मुली उत्तीर्ण झाल्या आहेत. तर जिल्ह्यात ९२.४२% मुले उत्तीर्ण झाली आहेत. नाशिकमध्ये विज्ञान शाखेचे सर्वाधिक विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. विज्ञान शाखेचे ३१४०४ प्रविष्ट झाले होते. त्यापैकी ३०८१५ विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून एकूण निकाल ९८.७५ % लागला. तर कला शाखेच्या २५४५३ पैकी २२५६० विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. वाणिज्यच्या १३४३९ पैकी १२२८६ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. यंदाच्या निकालात गतवर्षापेक्षा ६.९२ टक्क्याने घट झाली आहे.
गुण पडताळणीसाठी १० जूनपासून संधी ज्या विद्यार्थ्यांना गुण पडताळणी करायची आहे, त्यांना शुक्रवार दि. १० ते २० जून २०२२ या कालावधीत अर्ज करता येणार आहे. छायाप्रतीसाठी १० ते २९ जून २०२२ दरम्यान ऑनलाइन पद्धतीने अर्ज करता येणार आहे. पुरवणी परीक्षा जुलै-ऑगस्टमध्ये बारावीच्या परीक्षेत अनुत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांसाठी शिक्षण मंडळातर्फे जुलै व ऑगस्ट महिन्यात पुरवणी परीक्षा घेतली जाणार आहे. श्रेणीसुधार करण्यासाठी विद्यार्थ्यांना १० जूनपासून मंडळाच्या संकेतस्थळावर ऑनलाइन पद्धतीने अर्ज सादर करता येतील.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.