आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

परंपरेचं पान:अश्रद्धतेकडून श्रद्धतेकडे जाणाऱ्या प्रवासाची सोपी गाेष्ट म्हणजे गोदावरी; जितेंद्र जाेशीने उलगडला सिनेमाचा प्रवास

नाशिकएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

गाेदावरी ही केवळ एका कुटुंबाची गाेष्ट नाही, तर नदीकाठच्या परंपरेत अडकलेल्या, सुटलेल्या, मुक्त असलेल्या सगळ्यांची ती गाेष्ट आहे. अश्रद्धतेकडून श्रद्धतेकडे जाणाऱ्या प्रवासाची ती एक साधी, साेपी, प्रत्येकाला आपलीशी वाटणारी गाेष्ट म्हणजे ‘गाेदावरी’, असा संवाद अभिनेता, निर्माता जितेंद्र जाेशीने साधला.

कुसुमाग्रज स्मारकात गुरुवारी (दि. ३) दुपारी झालेल्या त्यांनी गाेदावरी चित्रपटाचा प्रवास उलगडला. यावेळी तो बोलत होता.

प्रामाणिक प्रयत्न

जितेंद्र जोशी म्हणाला की, अनाहुतपणे अंतरमनात अनेक गाेष्टी येत असतात. त्याचे कालांतराने अन्वयार्थ सापडतात. तसं गाेदावरीचं झालं. मनात काहीतरी घाेळत असतं. ते आम्ही प्रत्यक्षात उतरवण्यासाठी नाशिकला आलो. नाशिकला धार्मिक, सांस्कृतिक महत्त्व आहे. भारतातील क्वचितच काही शहरांसारखं नाशिक आहे. म्हणून नाशिकला आणि पर्यायाने गाेदावरीला आम्ही आमच्या चित्रपटाचा विषय केला. गाेदावरीच्या निमित्ताने आम्ही एका कुटुंबाची गाेष्ट घेऊन आलोय. नदी, कुटुंब व्यवस‌्था, श्रद्धा, परंपरा आणि आत्मशाेधाबद्दल काहीरती मांडण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला आहे. निशिकांत कामत यांना हा चित्रपट आम्ही समर्पित केला आहे. ११ ऑक्टोबरला ताे प्रदर्शित हाेत असल्याचेही त्याने सांगितले. यावेळी लेखक प्राजक्त देशमुख, अभिनेत्री गाैरी नलावडे हे देखील उपस्थित हाेते.

अडकलेल्या माणसाची कथा

गोदावरीची कथा एका अडकलेल्या माणसाची आहे. जी नदी वर्षानुवर्ष वाहतेच आहे. कितीतरी वर्ष वाहते आहे. या प्रवाहासमाेर काही अडकलेली माणसे आहेत. ताे इथे राहून ही अडकलेलाच आहे. त्यामुळेच मी जेव्हा जेव्हा गाेदावरीला स्पर्श करत गेलाे, तेव्हा - तेव्हा ती मला बदलत गेली. त्यानुसार माझ्या सिनेमाचा फाॅर्मही बदलत गेला. हा परंपरेबद्दल बाेलणारा सिनेमा आहे. गाेदावरीच्या परंपरेचंच एक पान उलगडण्याचा आम्ही प्रयत्न केल्याचे मत यावेळी लेखक, दिग्दर्शक निखिल महाजन यांनी मांडले.

सांस्कृतिक नाळ जाेडणारा चित्रपट

काेविड काळानंतर प्रेक्षकांना चित्रपटगृहात खेचून आणणं ही माेठी जबाबदारी आहे. आशयघन चित्रपट दाखविण्याच्या संस्कृतीतीलच एक चित्रपट म्हणजे गाेदावरी. सांस्कतिक नाळ जाेडणारा हा चित्रपट आहे. या माध्यमातून चित्रपटगृहांचं गाडं पुन्हा फिरून, रसिक पुन्हा चित्रपट गृहांकडे वळतील अशी एक अशा वाटते, असे यावेळी निखिल साने म्हणाले.

गाेदावरीचा आशय असा...

जुन्या नाशिकमधील एका वडिलाेपार्जित व्यवसायाची जबाबदारी बळजबरीने साेपवल्यामुळे आयुष्याकडे नकारात्मक बघणाऱ्या तरुणाची आणि त्याच्या कुटुंबांची ही गाेष्ट. निशिकांतची चिडचीड, भांडणं, नाखुशी याचा नकळत आपल्या जवळच्या व्यक्तींवर आणि नातेसंबंधांवर हाेणाऱ्या परिणामांमुळे कुटुंबापासून दूर गेलेल्या निशिकांतच्या आयुष्यात अशी काही अनपेक्षित बातमी येते की, ज्याने त्याच जगण्याचा दृष्टिकाेन बदलून जाताे आणि पुढे सगळंच बदलतं. हे सांगणारी गाेष्ट म्हणजे ‘गाेदावरी’ हा चित्रपट. या चित्रपटात जितेंद्र जाेशीसह नीना कुळकर्णी, संजय माेने, प्रियदर्शन जाधव, गाैरी नलावडे आणि विक्रम गाेखले यांच्या भूमिका आहेत.

बातम्या आणखी आहेत...