आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

व्यावसायिकांची फसवणूक:रक्कम ट्रान्सफर न करताच खाद्यतेल बाॅक्स लांबवला

सातपूर2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

सातपूर परिसरात भुरट्या चाेऱ्या तसेच दुकान व्यावसायिकांची फसवणूक करण्याच्या प्रकरणात माेठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. शुक्रवार (दि २) सकाळी ११ वाजेच्या दरम्यान नीलकंठेश्वरनगरात असलेल्या शिवसाई धान्य भांडार येथे अशाचप्रकारे दुचाकीवर आलेल्या युवकाने खाद्यतेलाचा बाॅक्स घेतला परंतु त्याची रक्कम फाेन पे ने ट्रान्सफर करताे असे सांगत बाेलण्यात गुंगवत धूम ठाेकली. दुचाकीवर आलेल्या या युवकाने किराणा दुकानातून खाद्यतेलाचा एक पूर्ण बॉक्स विकत घेतला.

दुकान मालकास फोन पे ने पैसे ट्रान्सफर करतो असे सांगत बॉक्स गाडीवर ठेवा, असे दुकान मालकास सांगितले. दुकानातील कामगाराने बॉक्स गाडीवर ठेवताच स्कॅन करण्याचा निमित्ताने दुचाकीजवळ जात दुचाकी सुरू करून वेगाने ती चालवत बॉक्स घेत पलायन केले. दुकान मालक स्वर्णसिंग राजपूत यांनी याप्रकरणी सातपूर पोलिस ठाण्यात या बाबतीत तक्रार केली आहे. सातपूर परिसरात गेल्या काही दिवसांपासून भुरट्या चोऱ्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर वाढ झालेली आहे.

पैसे पाठवत असल्याचे भासवत केली फसवणूक फोन पे वर स्कॅन करत असल्याचे भासवत गोडतेलाचा पूर्ण एक बॉक्स घेऊन संबंधितांनी गाडीवरून धूम ठोकली. - स्वर्णसिंग राजपूत, दुकान मालक, शिवसाई धान्य भांडार

दुचाकी घसरल्याने अपघातात चालक ठार भरधाव वेगात जाणाऱ्या दुचाकीवरील चालकाचा ताबा सुटल्याने दुचाकी स्लीप होऊन झालेल्या अपघातात दुचाकीचालक ठार झाला. इंदिरानगर बोगद्याकडून साईनाथ चौफुलीकडे जातांना जय माता दी नर्सरीसमोर हा अपघात घडला. याप्रकरणी मुंबईनाका पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेली माहिती आणि गणेश गांगुर्डे (रा. इंदिरानगर) यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, मित्र अमित विजयकुमार देशमुख (रा. रथचक्र चौक, इंदिरानगर) हा एमएच १५ सीजे ८६७२ या क्रमांकाच्या दुचाकीने भरधाव जात असता इंदिरानगर बोगद्याकडून साईनाथ चौफुलीकडे येत असतांना अमित देशमुख याचा दुचाकीवरील ताबा सुटल्याने दुचाकी स्लीप झाली. यात अमितच्या डोक्यास गंभीर मार लागल्याने त्याचा मृत्यू झाला. गांगुर्डे जखमी झाले. याप्रकरणी वरिष्ठ निरीक्षक सुनील रोहोकले यांच्या मार्गदर्शनाखाली तपास सुरू आहे. हेल्मेट असते तर वाचले असते प्राण : दुचाकीचालकाने हेल्मेट घातले असते तर प्राण वाचले असते. दुचाकीचालकाच्या डोक्यास मार लागल्याने मृत्यू झाल्याची माहिती प्रत्यक्षदर्शींनी दिली. हेल्मेटसक्ती सुरू असून दुचाकीचालक हेल्मेटचा वापर करत नसल्याने अपघाती मृत्यूचे प्रमाण वाढत आहे.

बातम्या आणखी आहेत...