आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Local
  • Maharashtra
  • Nashik
  • The Enthusiasm Of The Volunteers In The Campaign Of Shivkarya Gadkot Conservation Institute Made The Tanks On The Fort Ramshej Silt free And The Arsenal Bush free Through Labor Donation.

शिवकार्य गडकोट संवर्धन संस्थेच्या माेहीमेत स्वयंसेवकांचा उत्साह:श्रमदानातून किल्ले रामशेजवरील टाके गाळमुक्त अन् शस्त्रगार झुडुपमुक्त

नाशिक25 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक
शिवकार्य गडकोट संवर्धन संस्थेवतीने किल्ले रामशेजच्या १६७ व्या अखंडित दुर्गसंवर्धन मोहिमेत राबणारे दुर्गसंवर्धक. - Divya Marathi
शिवकार्य गडकोट संवर्धन संस्थेवतीने किल्ले रामशेजच्या १६७ व्या अखंडित दुर्गसंवर्धन मोहिमेत राबणारे दुर्गसंवर्धक.

शिवकार्य गडकोट संवर्धन संस्थेची अखंडित 167 वी दुर्गसंवर्धन मोहीम किल्ले रामशेजवर झाली. या मोहिमेत भर उन्हात दुर्गसंवर्धकानी किल्ल्याच्या मध्यभागी असलेल्या दोन पुरातन टाक्यांतील गाळ काढला. बाजूलाच असलेल्या झुडपात दडलेल्या शस्रगाराच्या वास्तूला झुडुपमुक्त केले. दुपारच्या सत्रात सैनिकी जोत्यांतील झाडांना पाणी घालण्यात आले, किल्ल्यावर येणाऱ्या दुर्गप्रेमींना रामशेजची माहिती देण्यात आली. किल्ला बघण्याचे तंत्र सांगितले.

शिवकार्य गडकोट संवर्धन संस्था गेल्या 23 वर्षांपासून नाशिकच्या 60 हून अधिक किल्ल्यांच्या दुर्गसंवर्धन मोहिमांसोबत किल्ले रामशेजच्या संवर्धनासाठी अखंडित राबत आहे. या माेहीमेत रामशेजच्या माथ्यावर असलेला जुना जीर्ण ध्वज काढून नवा भगवा ध्वज लावण्यात आला. दुर्गसंवर्धन व दुर्गजागृती अशी ही मोहीम निरंतर सुरू आहे. या मोहिमेत शिवकार्य गडकोट संवर्धन संस्थेचे श्रमदान समितीचे भूषण औटे पाटील, सल्लागार संजय झारोळे, वैभव मावळकर, वैभव पाटील, राम पाटील यांसारख्या अनेक दुर्गसंवर्धकांनी श्रमदानात भाग घेतला.

ऐतिहासिक पाऊलखूणा जपण्यासाठी अभ्यासात्मक संवर्धन

किल्ले रामशेज मराठ्यांच्या अजिंक्य लढ्याचे प्रतीक आहे. किल्ल्यावरील प्रत्येक ऐतिहासिक पाऊलखुणा दोन दशकांपेक्षा अधिक काळ श्रमदानातून अभ्यासात्मक संवर्धन करण्याचे काम सातत्याने संस्था करीत आहे, किल्ल्याच्या माथ्यावर दडलेल्या बुजलेल्या अनेक ऐतिहासिक पाऊलखुणा शोधून त्यांना दुर्गप्रेमींना अभ्यासता याव्यात अशा पद्धतीने जोपासत आहोत. 17 पाण्याचे टाके स्वच्छ व गाळमुक्त तर चुन्याचा घाणा, चोरखिंड, गोमुखी द्वार, टेहलनी बुरुज, मुख्यद्वार, तट बुरुजांच्या पाऊलखुणा स्वच्छ केल्या अाहेत. झुडुपमुक्त व प्लास्टीकमुक्त किल्ला ठेवण्यासाठी, झाडे टिकवण्यासाठी स्वखर्चाने श्रमदानाने राबत आहोत, किल्ल्यावर येणाऱ्यांसाठी "शिवरायांची दुर्गनिती,व दुर्गप्रेमींना सूचना देणारे" माथा पायथा असे चार फलक स्वखर्चाने लावले आहेत. कुठलीही लोकवर्गणी न घेता, किल्ला सर्वार्थाने राबत जपत असल्याचे शिवकार्य गडकाेट संवर्धन संस्थेचे संस्थापक राम खुर्दळ यांनी दिव्य मराठीला सांगितले.

बातम्या आणखी आहेत...