आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जिल्हाधिकारी कार्यालय:1869 चे प्रवेशद्वार झाले ‘स्मार्ट’ ; हुबेहुब प्रवेशद्वार 13 पासून खुले

नाशिक3 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

इंग्रजांच्या काळात १८६९ साली उभारलेल्या चिरेबंदी हवेली असलेल्या आताच्या नाशिक जिल्हाधिकारी कार्यालयाच्या वास्तूला दीडशे वर्षे पूर्ण झाली आहेत. स्मार्ट सिटीकडून या वास्तूचे प्रवेशद्वार नव्याने चिरेबंदी साकारण्यात आले आहे. स्मार्ट स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त १३ ऑगस्टपासून हे प्रवेशद्वार रहदारीस खुले हाेणार आहे.

जिल्हाधिकारी कार्यालयाचा शतकोत्तर सुवर्ण महोत्सव असल्याने त्याची प्राचीनता उठून दिसावी यादृष्टीने प्रवेशद्वार बांधून देण्याचे स्मार्ट सिटीकडून मान्य करण्यात आले. एक ते दीड वर्ष या प्रवेशद्वारावर काम चालले. या प्रवेशद्वाराचे काम सुरू असल्याने गेल्या दीड वर्षापासून ते बंदच हाेते. त्यामुळे जिल्हाधिकारी कार्यालयाच्या दुसऱ्या प्रवेशद्वारावर पादचारी आणि वाहतुकीचा भार येत हाेता. त्यामुळे तेथे गर्दी आणि काेंडी नित्याचीच झाली हाेती. या प्रवेशद्वारामुळे आता ती फुटणार आहे.

बातम्या आणखी आहेत...