आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

थंडीत वाढ:अवकाळीची पावसाची भीती गेली, पाच दिवस थंडी वाढणार - हवामानतज्ज्ञ माणिकराव खुळे

नाशिक5 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

राज्यात अवकाळी पावसाची शक्यता काही ठिकाणी पसरल्याने शेतकऱ्यांत भीतीचे वातावरण पसरले होते. परंतु, पुढील आठवड्यात अंशत: ढगाळ वातावरण राहणार असून पावसाची शक्यता नसल्याचे हवामानतज्ज्ञ माणिकराव खुळे यांनी सांगितले. उत्तरेकडे सलग एकामागोमाग येणारे पश्चिमी प्रकोप पाऊस, बर्फ, धुके, थंडी निर्माण करत मार्गक्रमण करीत आहे. आगामी पाच दिवस थंडीत वाढ राहणार आहे. वातावरणातील सापेक्ष आर्द्रताही सरासरीपेक्षा खालावलेली आहे. आकाश निरभ्र असल्याने रात्रीतून उत्सर्जित होणाऱ्या दीर्घ लहरी उष्ण ऊर्जाही आकाशात जाण्यासाठी कोणताही अडथळा निर्माण होत नाही.

बातम्या आणखी आहेत...