आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

दिव्य मराठी विशेष:नाशिकला तयार होणार देशातील पहिला ई-पासपोर्ट, आगामी वर्षात नागरिकांना उपलब्ध हाेणार

सचिन वाघ। नाशिक5 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • सिक्युरिटी प्रेसमध्ये छपाईसाठीच्या इन-ले टेंडर प्रक्रियेला सुरुवात, ई-पासपोर्ट हे पंतप्रधान मोदी यांचे स्वप्न

परदेशात जाण्यासाठी अत्यावश्यक दस्तएेवज असलेले पासपोर्ट नाशिकराेडच्या इंडिया सिक्युरिटी प्रेसमध्ये तयार केले जातात. आता देशातील पहिला ई-पासपाेर्टही याच प्रेसमध्ये तयार हाेणार आहे. प्रगत देशांप्रमाणेच भारतामध्येही प्रवाशांना ई-पासपाेर्ट देण्याचा पंतप्रधान नरेंद्र माेदी यांचा ड्रीम प्राेजेक्ट आहे. त्याच्या छपाईसाठी इन-ले तयार करण्याची याेजना ही दहा वर्षांपासून रखडलेली होती. आता त्यासाठीची टेंडर प्रक्रिया पूर्ण झाली आहे. त्यानुसार सिक्युरिटी प्रेसमध्ये पन्नास टक्के परदेशी कंपनी आणि पन्नास टक्के भारतीय कंपनीच्या माध्यमातून हा इन-ले तयार केला जाणार आहे. त्यातून तयार हाेणारे ई-पासपाेर्ट पुढील वर्षी भारतीय नागरिकांच्या हाती पडतील, असे नियाेजन आहे. इंडिया सिक्युरिटी प्रेसमध्ये पन्नास ते ५० हजार रुपयांपर्यंत शुल्क असलेले मुद्रांक तयार केले जातात. तसेच विविध देशांच्या मागणीनुसार लेबल तयार करून दिली जातात. सध्या कोरोनातही कामगारांनी नोटा व मुद्रांकांचा तुटवडा भासू नये, यासाठी सलग काम केले. पारंपरिक पासपोर्टही तयार करण्यात येत आहेत. प्रगतशील देशांप्रमाणेच भारतातही इ-पासपोर्ट तयार करण्याच्या दिशेने वाटचाल सुरू होती. परंतु क्लिष्ट नियमांमुळे १० वर्षापासून मुहूर्त लागत नव्हता. आता मोदी सरकारने त्यासाठी इन-ले तयार करण्याच्या टेंडरला मंजुरी दिली आहे. हा ७० टक्के इन-ले नोएडात तर ३० टक्के बंगळुरूमध्ये तयार हाेईल. नंतर ताे नाशिक येथील प्रेसमध्ये लावल्यावर छपाई सुरू होईल.

‘इन-ले’ म्हणजे काय?

ई-पासपोर्टमध्ये (इलेक्ट्राॅनिक) इन-ले हे सर्वात महत्त्वाचा घटक आहे. त्यास पासपाेर्टधारक व्यक्तीची संपूर्ण माहिती असते. याची रचना सीमकार्ड प्रमाणे असते. पासपोर्टमध्ये शेवटच्या पानावर ताे बसविलेला असताे. सध्या पारंपरिक पद्धतीने दरवर्षी सुमारे १ कोटी पासपोर्ट छापले जातात. ई-पासपोर्ट हे दरवर्षाला सुमारे दुप्पट म्हणजे २ कोटी छापावे लागणार आहेत.

ई-पासपोर्ट हे पंतप्रधान मोदी यांचे स्वप्न...

ई-पासपोर्ट तयार व्हावेत हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे स्वप्न आहे. त्याच्या आणि पर्यायाने देशाच्या सुरक्षेत महत्त्वाची भूमिका बजावण्याची संधी सिक्युरिटी प्रेसच्या कामगारांना मिळणार असल्याने ही सर्वांसाठीच अभिमानाची बाब आहे. - जगदीश गोडसे, सरचिटणीस, मजदूर संघ

गैरप्रकाराचा धोका टळणार

ई-पासपाेर्ट कार्यान्वित झाल्यानंतर बनावट छापील पासपोर्ट तयार करण्याचे गैरप्रकार पूर्णपणे राेखता येतील. त्यामुळे घुसखाेरी, अवैध प्रवास टळून देशाची सुरक्षा अधिक मजबूत हाेण्यास मदत हाेईल.

मान महाराष्ट्राला याचा अभिमान

देशात फक्त नाशिक येथे ई-पासपोर्ट तयार करण्यात येतील. हा मान महाराष्ट्राला आणि नाशिकला मिळाल्याचा आम्हाला अभिमान आहे. सर्व कामगार बंधूही त्यात सहभागी हाेतील. - ज्ञानेश्वर जुंद्रे, कार्याध्यक्ष मजदूर संघ

Open Divya Marathi in...
  • Divya Marathi App
  • BrowserBrowser