आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नाट्य स्पर्धेत सादरीकरण:पूर्वार्ध रंगला; उत्तरार्ध ढेपाळला

नाशिक11 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

सुरुवात अतिशय चांगली झाली, त्यामुळे स्पर्धा नियमित बघणाऱ्या रसिकांच्या नाटकाकडून अपेक्षा उंचावल्या. मात्र नाटक जसजसं पुढे सरकत हाेतं तसतसा अपेक्षाभंग हाेत गेला. त्यातही नाटकाचा पूर्वार्ध थाेडा तरी रंगला, मात्र उत्तरार्ध पूर्णत: ढेपाळत गेला किंबहुना काही ठिकाणी ताे भरकटत गेल्याचीही जाणीव हाेत हाेती. कथेच्या उत्तरार्धातच फारसा दम नसल्याने कदाचित असे झाले असावे अशी चर्चाही मग रंगकर्मींनी प. सा.च्या बाहेर पडताना केली.

६१व्या राज्य हाैशी नाट्य स्पर्धेत मंगळवारी (दि. २२) प. सा. नाट्यगृहात रंगकर्मी थिएटर्स, नाशिकने अशाेक कांबळी लिखित, जयदीप पवार दिग्दर्शित ‘कावळ्याचं घर शेणाचं’ हे नाटक सादर केले. नाटकाची सुरूवात चांगली झाली. त्यामुळे स्पर्धेत हे नाटक सुखद अनुभव देईल, असे वाटत असतानच नाटकाने निराश करायला सुरुवात केली. नेपथ्य साजेसं आणि आटाेपशीर हाेते. मात्र उंबरमाळी स्टेशन असलेल्या या ठिकाणी बाेर्डाच्या पुढे दाेन माेडे ठेवले हाेते, त्यापुढे आेटावजा बाकडा, त्यातही एका प्रसंगत तरुण फलकाच्या मागे जाताे. नाटक प्रेक्षकांच्या पुढे म्हणजे फलकाच्या पुढे घडते. मग नक्की ट्रेन जाते कुठून? असा प्रश्न पडत हाेता. नाटकाची प्रकाशयाेजना मात्र चांगली हाेती.

संगीतानेही नाटकाला चांगली साथ दिली. मात्र कथेनेच नाटकाचा हात अर्ध्यात साेडला असे म्हणावे लागेल.पूर्वार्ध बऱ्यापैकी नाटकाला पुढे नेत हाेता. मात्र उत्तरार्ध अत्यंत वेगळा वाटत हाेता. म्हाताऱ्याच्या भूमिकेतील शुभम धांडे आणि दिनेश पवार अशा काही कलाकारांचा अभिनयही छान हाेता.

या नाटकाचे नेपथ्य पीयूष भांबळे, संगीत राहुल कानडे, प्रकाशयाेजना जयदीप पवार, रंगभूषा बाणिक कानडे, वेशभूषा कविता देसाई यांची हाेती. तर सिद्धी बाेरसे, राहुल बर्वे, वैषष्वी मेटकर, साक्षी बनकर, हर्षल जाेशी, करण राजपूत, सनी शंखपाळ, अनिकेत महाजन, आदित्य तांबे, सीमा पाठक, राहुल पाटील, चिराग चव्हाण, रुद्राक्ष गायकवाड, संस्कृती पवार, आदित्य शिराेडे, हर्ष भांडगे यांच्या नाटकात भूमिका हाेत्या.

बातम्या आणखी आहेत...